वानखेडे स्टेडियमचे ग्राउंडमन असलेले ५७ वर्षीय वसंत मोहिते यांच्या आयुष्यात अनेक बदल झाले आहेत. ते सध्या आलिशान हाॅटेलांमध्ये राहत आहेत. हे सर्व आयपीएलमुळे शक्य झाले आहे. आयपीएलच्या या हंगामामुळे मोहिते यांचे आयुष्य पलटले आहे. त्यांना तेथे जे मिळालं ते त्यांना सर्वसाधारण माणूस म्हणून मिळाल नसतं. यावर्षी चॉकलेट बनवणारी कंपनी कॅडबरीने मैदानाचे व्यवस्थापण सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहण्याची सोय मुंबईच्या फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये केली आहे.
ग्राउंड स्टाफचे कष्ट नेहमीच न पाहिल्यासारखे होते. खूप कमी लोक त्यांच्यावर लक्ष देत असतात. या ग्राउंड स्टाफला डिझायनर मसाबाने डिझाईन केलेले ड्रेस मिळाले आहेत. त्यांना अनेक सुख-सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये त्यांना जेवणासोबतच, मैदानापासून हाॅटेलपर्यंत जाण्यासाठी बस मिळाली आहे.
वसंत हे सर्व चमत्कार झाल्याचे मानत आहेत. माध्यमांतील वृत्तांनुसार, ते म्हणाले की, एक दिवशी मुंबई क्रिकेट असोसिएशन मला म्हणाले या हंगामात तुमच्या राहण्याची सोय कॅडबरी कंपनी करणार आहे. ते आम्हाला कपडे देतील आणि खाण्याची सोय करणार आहेत आणि तेही आयपीएल सुरू आहे तोपर्यंत. म्हणजेच पुढील दोन महिन्यांपर्यंत असणार आहे.
वसंत मोहित यांचे आयुष्य यापूर्वी खूप वेगळे होते, खूप कठीण होते. सामने सुद्धा रात्री उशिरा संपत होते आणि त्यांची शिफ्ट रात्री उशिरा संपत होती. एवढ्या रात्री त्यांना घरी जाणे शक्य होत नव्हते. म्हणून ते स्टेडियमच्या खालच्या लहान खोल्यांमध्ये झोपायचे.
ते म्हणाले, “या खोल्यांमध्ये मच्छर चावायचे. सामन्यानंतर आम्ही कोठे जाऊ शकत नव्हतो. ट्रेन बंद होत होत्या. त्यामुळे आम्ही मैदानातच ऑफिसमध्ये झोपायचो. जर कोणता सामना नसेल, तर सकाळी ९ वाजता मैदानात हजर राहत होतो आणि संध्याकाळी ६ वाजेपर्यंत काम करत होतो. परंतु सामन्यादिवशी आम्हाला लवकर यावे लागायचे. कारण, आम्ही उशिरापर्यंत थांबायचो. उशिरापर्यंत थांबल्यानंतर असोसिएशन दुप्पट पैसै देत होते.”
“ड्रेसिंग रुममध्ये जाणे आता पहिल्यासारखे राहिले नाही. आमच्याकडे आमची बस आहे, जी आम्हाला घेऊन जाते. माझ्याकडे शब्द नाहीत. फक्त एवढेच म्हणेल ‘धन्यवाद.'” मोहित मुंबईच्या खेळाडूंचा प्रवास जवळून ओळखतात. ते म्हणाले, “ते माझी खूप काळजी घेतात. ते येतात आणि माझी विचारपूस करतात. विनोद कांबळी, सचिन तेंडुलकर, अजित आगरकर याची संपूर्ण काळजी घ्यायचे की, मला ड्रेसिंग रुममध्ये काही त्रास होऊ नये. मी पाहिले की, अमोल मजूमदार किती आवडीने खेळतात. बाद झाल्यानंतर ते सर्वात जास्त नाराज होत असे.”
“सांगण्याची गरज नाही की, खेळाडूंना एकांत हवा असतो. मी खेळाडूंना सुख-दुख:त पाहिले आहे. मी सचिन तेंडुलकरला रडताना पाहिले आहे. ते त्यांच्या निवृत्तीच्या सामन्यात खेळपट्टीवर रडले होते, मी तो क्षण पाहिला आहे. मी सुद्धा स्वत:ला रोखू शकलो नव्हतो. दोन दिवस माझे मन भरून आले होते,” असेही पुढे बोलताना ते म्हणाले.
सध्या आयपीएलचा १५वा हंगाम सुरू आहे. या हंगामात एकूण १० संघ खेळत आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्यावेळी धोनीने ताहीरला काय सांगितले माहित नाही, पण माझा झेल गेला’, इशान किशनने सांगितला किस्सा
ऑस्ट्रेलियाचा विजयरथ सुसाट! पाकिस्तानविरुद्ध कसोटीनंतर आता टी२० मालिकाही केली नावावर