वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. यावेळी संपूर्ण भारतभर हा विश्वचषक आयोजित होईल. या विश्वचषकात सर्वांची नजर भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान होणाऱ्या सामन्यावर असेल. हा सामना चांगलाच संघर्षपूर्ण होईल अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र, पाकिस्तानचा माजी कर्णधार व दिग्गज वेगवान गोलंदाज वकार युनिस याने पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा कमजोर असल्याचे त्याने म्हटले.
विश्वचषकाआधी प्रसारण वाहिनीवर बोलताना वकार याने भारत आणि पाकिस्तान या संघांची तुलना केली. त्यावेळी पाकिस्तानचा संघ हा कमजोर असल्याचे त्याने म्हटले. तो म्हणाला,
“भारत आणि पाकिस्तान हा सामना सर्व सामन्यांमधील सर्वोत्तम सामना असतो. मात्र, प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास आत्ताचा भारतीय संघ हा पाकिस्तानपेक्षा खूपच सक्षम असून, पाकिस्तान कमजोर दिसून येतो.”
भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान 14 ऑक्टोबर रोजी विश्वचषकातील सामना होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा मोठा सामना खेळत जाईल. आतापर्यंत वनडे विश्वचषकात पाकिस्तान भारताला एकदाही पराभूत करू शकला नाही. सातही विश्वचषकात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव.
विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ-
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, फखर झमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिझवान, सौद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन आफ्रिदी, मोहम्मद वसीम.
(Waqar Younis Said Pakistan Is Weaker Than India In ODI World Cup)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
BREAKING: विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाने केला संघात बदल, तुफानी फॉर्ममधील खेळाडूला दिली एंट्री