युएईत होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 स्पर्धेच्या उर्वरीत हंगामाला सुरुवात होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी संघ आणि त्यांचे खेळाडू हळूहळू युएईत दाखल होऊ लागले आहेत. यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
भारताचा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा (आरसीबी) अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. आयपीएलमधील आरसीबीचा महत्त्वाचा खेळाडू सुंदर बोटाच्या दुखापतीनंतर इंग्लंडमधून भारतात परतला होता.
आरसीबीने एका निवेदनात म्हटले की, ‘अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला आयपीएल 2021 च्या उर्वरित सामन्यात बोटाच्या दुखापतीमुळे वगळण्यात आले आहे. बंगालचा क्रिकेटपटू आणि फ्रँचायझीचा नेट गोलंदाज आकाश दीपला त्याच्या जागी संघात समाविष्ट करण्यात आले आहे.’
भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना सराव सामन्यादरम्यान वॉशिंग्टन सुंदरच्या बोटाला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो इंग्लंड दौऱ्यावरून मायदेशी परतला होता. यादरम्यान त्याने बोटाच्या दुखापतीवर उपचार घेतले. मात्र आयपीएल स्पर्धेपूर्वी त्याची जखम पुर्णपणे बरी होण्याची शक्यता मावळली असल्याने त्याने आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्यातून माघार घेतली आहे.
आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी आरसीबीने तीन नवीन परदेशी खेळाडूंचा संघात समावेश केला होता. यात श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा, दुश्मंथा चामिरा आणि सिंगापूरचा टिम डेविड यांच्या नावांचा समावेश आहे. काही दिवसांपुर्वीच आरसीबीने या खेळाडूंना कररारबद्ध केले होते. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांना आयपीएल स्पर्धेत खेळण्याची परवानगी नाकारली होती. पण आता श्रीलंका क्रिकेट बोर्डाने त्यांना आयपीएल खेळण्यासाठी परवानगी दिली आहे.यामुळे हे दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये खेळण्यास सज्ज झाले आहेत.
भारताविरुद्ध, काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत पार पडलेल्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत या दोन्ही गोलंदाजानी चांगली कामगीरी केली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्यांची आयपीएलमध्ये निवड झाली आहे. येत्या 19 सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लीड्स ते लंडन, भारतीय क्रिकेटर्स लक्झरी ट्रेनने पोहोचले ओव्हलला; पाहा प्रवासातील भारी फोटो
शाहिद आफ्रिदीला आला तालीबान्यांचा पुळका; केले असे वक्तव्य की, नेटकऱ्यांनी घेतले फैलावर
‘तो इथेच चुकतोय’; मोठ्या खेळीसाठी झगडत असलेल्या कोहलीची माजी कसोटीपटूने दाखवून दिली चूक