भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याची बॅट 2022 या वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये शांत बसण्याचं नाव घेत नाहीये. सूर्यकुमार याने टी20 विश्वचषक 2022मध्येही आपल्या फलंदाजीचा दम दाखवून दिला आहे. त्याने सुपर 12 फेरीत खेळलेल्या 5 सामन्यात 193.96च्या स्ट्राईक रेटने 225 धावा चोपल्या आहेत. त्याने रविवारी (06 नोव्हेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर झिम्बाब्वेविरुद्ध नाबाद 61 धावांची खेळीही साकारली. त्याच्या खेळीमुळे भारतीय संघाला मोठे आव्हान उभे करता आले. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसिम अक्रम तोंडभरून कौतुक केले आहे.
सूर्यकुमारच्या सातत्यपूर्ण कामगिरीनंतर वसिम अक्रम यांनी त्याची तारीफ केली. त्याच्या खेळाबाबत बोलताना ते म्हणाले,
“मला वाटते की सूर्यकुमार वेगळ्या ग्रहावरून आला आहे. तो इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा वाटतो. त्याने किती धावा केल्या आहेत. त्याने केवळ झिम्बाब्वेविरुद्धच नव्हे, तर जगातील अव्वल गोलंदाजी आक्रमणांविरुद्ध धावा केल्या आहेत. तो खेळताना असामान्य वाटतो.”
ते पुढे म्हणाले,
“त्याला टी20 मध्ये बाद काढण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? मला असे म्हणायचे आहे की वनडे आणि कसोटीमध्ये तुम्ही योजना आखून त्याला बाद करू शकता. परंतु टी20 मध्ये तसाही गोलंदाज बॅकफूटवर असतो. जेव्हा कोणी या फॉर्ममध्ये असतो, त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे खूप कठीण आहे. मला वाटते की, गेल्या सामन्यात पाकिस्तानने त्याच्याविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्यांनी त्याच्यावर आखूड टप्प्याच्या चेंडूचा वर्षाव केलेला. कदाचित त्याला बाद करण्याचा हाच मार्ग असेल.”
भारतीय संघाला सूर्यकुमार यादवकडून टी20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत साखळी फेरीत केलेल्या कामगिरीची अपेक्षा असेल. टी20 फलंदाजांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असलेला सूर्यकुमार टी20 विश्वचषकात सध्या सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. ( Wasim Akram Praised Suryakumar yadav)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिकी पॉंटिंगची भविष्यवाणी! म्हणाला ‘हा’ बनू शकतो ऑस्ट्रेलियाचा पुढचा कर्णधार
टी20 विश्वचषकाच्या धामधुमीत किंग कोहली ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ’, महिलांमध्ये ‘ही’ ठरली विजेती