येत्या ४ ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ट्रेंट ब्रीजच्या मैदानावर खेळला जाणार आहे. हा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील मुख्य फलंदाज मयंक अगरवाल याला सराव करत असताना डोक्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे भारतीय कर्णधाराची आणि संघ व्यवस्थापकांची चिंता वाढली आहे.
अशातच माजी भारतीय फलंदाज वसीम जाफर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करत, भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन कशी असावी? याबाबत माहिती दिली आहे.
वसीम जाफर हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते क्रिकेटशी निगडित असलेल्या अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडत असतात. अशात त्यांनी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना सल्ला दिला आहे. परंतु हे ट्विट पाहून अनेकांना डोकं खाजवण्याची वेळ आली असेल. कारण त्यांनी सरळ ११ खेळाडूंची नावे किंवा फोटो न देता, ११ वेगवेगळ्या सेलिब्रिटी आणि खेळाडूंच्या फोटोचा कोलाज केला आहे. त्यावर त्यांनी कॅप्शन म्हणून, “पहिल्या कसोटी सामन्यासाठी माझी प्लेइंग ११.. ओळखा पाहू..” असे लिहिले आहे.
My Playing XI for the first test🤓 #ENGvIND #decode pic.twitter.com/nFohm9cUpD
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 2, 2021
वसीम जाफर यांच्या अनोख्या पोस्टचे विश्लेषण
पहिल्या फोटोमध्ये ऋतिक रोशनचा फोटो आहे. जो ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटात त्याचे नाव रोहित असे होते. तर दुसऱ्या फोटोमध्ये शाहरुख खानचा फोटो आहे. शाहरुख खानने अनेक चित्रपटात राहुलची भूमिका बजावली आहे. त्यामुळे वसीम जाफर यांच्या मते, रोहित शर्मा आणि केएल राहुलला सलामी फलंदाजी करण्याची जबाबदारी दिली गेली पाहिजे. तर तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा (काउंटी संघात त्याला स्टीव्ह या नावाने ओळखले जाते). तर चौथ्या फोटोमध्ये विराट कोहलीसारखा हुबेहूब चेहरा असणाऱ्या अभिनेत्याच्या फोटो आहे. अर्थात चौथ्या क्रमांकावर विराटने फलंदाजी करावी असे जाफर यांचे मत आहे.
पाचव्या फोटोमध्ये त्यांनी जॉन अब्राहमचा फोटो कोलाज करून टाकला आहे. जॉन अब्राहमने एका चित्रपटात अज्जू हे पात्र साकारले होते. याचा अर्थ हा की हे अजिंक्य रहाणेसाठी होते. तसेच सहाव्या फोटोमध्ये त्यांनी सौरभ पंतचा फोटो कोलाज करून टाकला आहे. याचा अर्थ असा की, वसीम जाफर यांनी यष्टिरक्षक फलंदाज म्हणून रिषभ पंतची निवड केली आहे. सातवा फोटो हा रवी शास्त्री यांचा आहे. याचा अर्थ असा की, त्यांनी अष्टपैलू रवींद्र जडेजाला या संघात स्थान दिले आहे.
तर आठव्या फोटोमधील पात्र आर अश्विनशी संबंधित आहे. एका वेब सिरिजमध्ये या पात्राचे नाव अश्विन होते. तर नववा फोटो मोहम्मद अलीचा आहे. याचा अर्थ असा होतो की, त्यांनी मोहम्मद शमी किंवा मोहम्मद सिराज यांपैकी एकाला संधी दिली आहे. तर १० व्या फोटोमध्ये रणवीर सिंगचा खिलजी लूक आहे. जो ईशांत शर्मासारखा असल्याचे दिसून येत आहे. जर ११ वा खेळाडू म्हणून त्यांनी जसप्रीत बुमराहला संधी दिली आहे.(Wasim jaffer secret Message to select playing 11 of Indian team for first test match)
अशी आहे वसीम जाफर यांनी निवडलेली प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, केएल राहुल,अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), आर अश्विन,रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी/मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
महत्त्वाच्या बातम्या-
पुजारा इंग्लंडविरुद्ध करणार सलामीला फलंदाजी? उपकर्णधार रहाणेने दिले ‘हे’ उत्तर
‘नेक्स्ट स्टॉप इंग्लंड’! अखेर सूर्यकुमार अन् पृथ्वीने इंग्लंडसाठी भरली उड्डाण, फोटो केले शेअर
धोनीने ६ वर्षांपूर्वी ‘तो’ सल्ला दिला, म्हणूनच मी चांगला फलंदाज बनलो; जडेजाचा मोठा उलगडा