---Advertisement---

आपल्याच जाळ्यात अडकला पीटरसन; इंग्लंडला ‘ब’ दर्जाचा संघ म्हणताच वासिम जाफरने दिले सणसणीत प्रत्युत्तर

On: बुधवार, फेब्रुवारी 17, 2021 6:00 AM
---Advertisement---

चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर खेळवल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात भारतीय संघाने मंगळवारी(१६ फेब्रुवारी) इंग्लंडचा पराभव केला. याच मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यातील पराभवाचा वचपा काढत इंग्लंडला ३१७ धावांनी पराभूत केले. यासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी देखील साधली.

मात्र इंग्लंडच्या या पराभवानंतर माजी खेळाडू केव्हिन पीटरसनची चांगलीच पंचाईत झाली आहे. इंग्लंडचा संघ भारतात येण्यापूर्वी तसेच इंग्लंडच्या पहिल्या सामन्यातील विजयानंतर केव्हिन पीटरसन ट्विटरवर चांगलाच सक्रिय होता. मात्र आता दुसर्‍या कसोटी सामन्यातील एका ट्विटने तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे.

अभिनंदन करताना मारला टोमणा
त्याचे झाले असे की, भारतीय संघाने दुसर्‍या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर पीटरसनने एक ट्विट केले. ज्यात त्याने विजयाबद्दल भारतीय संघाचे अभिनंदन केले. मात्र त्याचवेळी भारताने इंग्लंडच्या ‘ब’ संघाला हरवले असा टोमणा देखील मारला. इंग्लंडने त्यांच्या प्रमुख खेळाडूंना या कसोटीत संधी न दिल्याने भारताला विजय मिळवता आला, अशा अर्थाचे ट्विट पीटरसनचे होते.

https://twitter.com/KP24/status/1361574807167528962

पीटरसन आला चाहत्यांच्या निशाण्यावर
मात्र, केव्हिन पीटरसनचे हे ट्विट अनेक चाहत्यांना पसंत पडले नाही. त्यांनी पीटरसनला ट्रोल करत आपली नाराजी व्यक्त केली. केवळ चाहतेच नव्हे, तर भारताचा माजी सलामीवीर वासिम जाफरने देखील पीटरसनला प्रत्युत्तर दिले.

पीटरसनच्या ट्विटला उत्तर देताना जाफर म्हणाला, “मित्रांनो, पीटरसनला ट्रोल करू नका. तो गंमत करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला असं वाटतं आहे की दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या अनुपस्थितीत इंग्लंडचा संघ त्यांच्या पूर्ण ताकदीचा संघही नाही.” जाफरच्या या ट्विटला चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळते आहे. तसेच इतर चाहत्यांनीही पीटरसनच्या ट्विटवर भन्नाट मिम्स तयार केले आहेत.

दरम्यान, भारताच्या या विजयामुळे चार सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. मालिकेचे दोन सामने बाकी असून हे दोन्हीही सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर खेळवले जातील. यातील तिसरा सामना गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“त्याला जाऊ देणे गरजेचे होते”, रूटने सांगितले मोईन अलीला मायदेशी पाठवण्यामागचे खरे कारण

सामनावीर पुरस्कार मिळाल्यानंतर आली अश्विनची प्रतिक्रिया, ‘या’ व्यक्तीला दिले शतकाचे श्रेय

नेटकरी जोमात, इंग्लंड कोमात! भारताच्या विजयानंतर चाहत्यांचा उत्साह, सोशल मिडीयावर मिम्सचा सुळसुळाट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---