भारतीय संघाचा माजी सलामीवीर वासिम जाफर आपल्या मजेदार स्वभावासाठी चांगलाच प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावर तो सातत्याने विविध घटनांवर प्रतिक्रिया देताना गमतीदार पोस्ट करत असतो. यावेळी त्याच्या निशाण्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मार्कस हॅरिस आला आहे. हॅरिस याने भारताचा फलंदाज चेतेश्वर पुजारा याच्यावर केलेल्या एका टिप्पणीवर जाफरने आता प्रतिक्रिया दिली आहे.
हॅरिसने दिली होती अशी प्रतिक्रिया
भारतीय संघाने या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेत पराभूत करण्याची किमया केली होती. मालिकेच्या ब्रिस्बेन येथील अखेरच्या कसोटीतील शेवटच्या दिवशी भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने अत्यंत धैर्याने फलंदाजी करत भारताच्या विजयाचा पाया रचला.
पुजाराने आपल्या खेळीदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांचे अनेक चेंडू आपल्या शरीरावर झेलले. पुजाराच्या या खेळीचे कौतुक करताना ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मार्कस हॅरिस याने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, “गाबा (ब्रिस्बेन) कसोटी चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलियन फलंदाजांप्रमाणे फलंदाजी केली. त्याच्या या खेळीने सामन्यात अंतर निर्माण झाले. त्याने शरीरावर बरेच वार झेलले मात्र तो स्वस्तात बाद झाला नाही. त्याच्यामुळेच इतर फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी केली व सामना भारताच्या बाजूने झुकवला.” १९८८ नंतर ऑस्ट्रेलिया या मैदानावर प्रथमच पराभूत झाला होता.
जाफरने केली मस्करी
हॅरिस याच्या या वक्तव्यानंतर भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफर याने ट्विट करत एक गमतीदार प्रतिक्रिया दिली. जाफरने लिहिले, ‘असे होते तर ऑस्ट्रेलियन फलंदाज ऑस्ट्रेलियन फलंदाजांना सारखी फलंदाजी का करू शकले नाहीत.’ त्याच्या या ट्विटनंतर चाहत्यांनी अनेक गमतीदार कमेंट देखील केल्या आहेत.
Wonder why the Australians didn't bat like Australians 🤷🏽♂️😀 pic.twitter.com/BFSt9JFEm1
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) May 21, 2021
भारताने मिळवला होता ऐतिहासिक विजय
ऍडलेड येथील पहिल्या कसोटीत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागल्यानंतर व नियमित कर्णधार विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारताने २-१ अशा फरकाने मालिका विजय साजरा केला होता. रहाणेने सर्व युवा खेळाडूंना हाताशी धरत सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात मालिका जिंकण्याची कामगिरी करून दाखवली.
महत्त्वाच्या बातम्या –
महिला संघाच्या प्रशिक्षक निवडीचा वाद संपेना! आता गांगुलीने ‘या’ कारणाने व्यक्त केली नाराजी
कसोटी पदार्पणात सलग ३ शतके ठोकताना मोहम्मद अझरुद्दीनने वापरलेली बॅट निवडली होती ‘या’ खास व्यक्तीने
“सामन्यातच नाही तर नेट्समध्ये देखील विराट कोहली गोलंदाजांना घाम फोडतो”