पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) नामिबियाचा फलंदाज डेव्हिड विजने (David Wiese) तुफानी फलंदाजी करत पाकिस्तानी गोलंदाजाना त्रासून सोडले. पीएसएलच्या दुसऱ्या एलिमिनेटरमध्ये लाहोर कलंदर्सने इस्लामाबाद युनायटेडचा ६ धावांनी पराभव केला. २० व्या षटकात फलंदाजी करताना वकास मकसूदच्या षटकात विजला २७ धावा दिल्याने इस्लामबाद युनायटेडचा पराभव शेवटच्या षटकात झाला. हेच षटक सामन्याची महत्त्वपूर्ण गोष्ट ठरले. २० व्या षटकाच्या आधी विजने केवळ २ चेंडूंचा सामना केला होता. २० व्या षटकात या नामिबियाच्या फलंदाजाने फलंदाजी करत पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांना त्रासून सोडले.
वकास मकसूदने पहिला चेंडू वाईड टाकला. ज्यावर फक्त १ धाव मिळाली, पुढच्या चेंडूवर विजने षटकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही विजने पुन्हा षटकार मारला. तिसऱ्या चेंडूवर फलंदाजाने चौकार मारला. चौथ्या चेंडूवर २ धावा आल्या, त्यानंतर फलंदाजाने पाचव्या चेंडूवर षटकार मारला आणि षटकाच्या शेवटच्या चेंडूवर २ धावा घेत संघाची धावसंख्या १४१ वरून थेट १६८ धावांवर नेली. १९ षटकांचा खेळ संपला, तेव्हा लाहोरने ७ गड्यांच्या मोबदल्यात १४१ धावा केल्या होत्या. २० षटकांनंतर संघाने ७ बाद १६८ धावा केल्या होत्या.
'WIESE' is all you could hear in the ground as the big man flaunted his firepower. #HBLPSL7 I #LevelHai I #LQvIU pic.twitter.com/JTHrBuFHVA
— PakistanSuperLeague (@thePSLt20) February 25, 2022
षटकात वकास मकसूदने पूर्ण २७ धावा दिल्या. डेव्हिड विज ८ चेंडूत २८ धावांवर होता, ज्यामध्ये त्याने ३ षटकार आणि १ चौकार लगावले होते. यानंतर लक्षाचा पाठलाग करताना इस्लामाबाद युनायटेड संघाने १९.४ षटकात ६२ धावा केल्या आणि लाहोर कलंदर्सचा संघ पीएसएलच्या अंतिम फेरीत पोहोचला. डेव्हिड विजला त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
नामिबियाच्या विजचा धडाकेबाज फलंदाजीचा व्हिडिओ पाकिस्तान सुपर लीगच्या अधिकृत अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. गोलंदाजीतही शानदार कामगिरी करताना हा अष्टपैलू खेळाडू १ बळी घेण्यातही यशस्वी ठरला. डेव्हिड विजने नामिबिया संघात येण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. पीएसएलमध्ये एकूण ३३ सामने खेळले गेले आहेत. आता अंतिम सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) पार पडणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजीत सोडा, हिटमॅन रोहितचं क्षेत्ररक्षणातही अर्धशतक, बनला पहिलाच भारतीय; बघा तो खास क्षण
अय्यरमुळे पूर्ण झाला जडेजाचा बदला! सलग ६, ४, ६ ठोकणाऱ्या श्रीलंकन फलंदाजाला असं केलं चालतं