भारतीय संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. या दौऱ्यात भारताला दक्षिण अफ्रिकेविरुद्ध तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिका खेळायच्या आहेत. भारताचा युवा वेगवान गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) याला या दौऱ्यासाठी राखीव गोलंदाजाच्या रूपात संघात सामील केले गेले आहे. कसोटी मालिकेची सुरुवात २६ डिसेंबरपासून होणार असून तत्पूर्वी भारतीय खेळाडू सराव करत आहेत. दरम्यान दिपक चाहरने सराव सत्रातील एक खास व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो भारतीय फलंदाजांसमोर अप्रतिम गोलंदाजी करताना दिसत आहे.
दिपक चाहरने त्याच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो नेट्समध्ये भारतीय फलंदाजांसमोर गोलंदाजी करत आहे. यावेळी त्याची लाइन-लेंथ अगदी योग्य दिसत आहे आणि स्विंगही चांगला मिळत आहे. व्हिडिओत त्याने टाकलेले काही चेंडू दाखवले गेले आहेत आणि यादरम्यान फलंदाजांपुढे आव्हान उभे राहिल्याचे दिसत आहे.
व्हिडिओत ऋद्धिमान साहा आणि प्रियांक पांचाल फलंदाजी करत आहेत आणि त्यांना चाहरची गोलंदाजी खेळणे अवघड जात असल्याचे दिसत आहे. चाहरने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे की, “लाल चेंडू मजेदार आहे.”
हेही वाचा- पुजारा-रहाणेला जुन्या रंगात आणण्यासाठी महागुरूने घेतली धोनीच्या ‘शागीर्द’ची मदत, व्हिडिओ व्हायरल
चाहरने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहत्यांच्या मते आशिया खंडात अशाप्रकारची गोलंदाजी करणे कठीण आहे आणि त्याव्यतिरिक्त इतर खंडात मात्र वेगवान गोलंदाजांसाठी परिस्थिती अनुकूल असते. एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, “यात काहीच शंका नाही की, उपखंडात असे प्रदर्शन होऊ शकत नाही. आशिया खंडाच्या बाहेर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक फायदेशीर आहे.”
Red ball is fun ☺️ #TeamIndia #BleedBlue pic.twitter.com/eRkF0PupYk
— Deepak chahar 🇮🇳 (@deepak_chahar9) December 22, 2021
दीपक चाहरने अद्याप त्याचे कसोटी पदार्पण केलेले नाही. तो त्याच्या गोलंदाजीवरील नियंत्रण आणि चेंडू दोन्ही दिशेला स्विंग करण्यासाठी ओळखला जातो. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात चाहरसोबत नवदीप सैनी, सौरभ कुमार आणि अरजान नागवासाला यांना भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंच्या रूपात सामील केले गेले आहे. त्याव्यतिरिक्त दिग्गज सलामीवीर रोहित शर्मा आणि अष्टपैलू रवींद्र जडेजा यांनी दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे.
महत्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! भारतीय क्रिकेटच्या सुवर्ण काळाचा अखेरचा शिलेदार हरभजन सिंग निवृत्त
जेव्हा सगळ्या टीम इंडियाला सोडलं, पण हरभजन सिंगला मात्र न्यूझीलंडच्या विमानतळावर पकडलं
…म्हणून कोट्यावधी खर्च करून मनिष पांडेला बनविले जाणार आरसीबीचा कर्णधार!
व्हिडिओ पाहा –