---Advertisement---

पंतने शतक पूर्ण करतात कौतुक करण्यासाठी बाल्कनीत पळत आला कर्णधार कोहली, पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, मार्च 5, 2021 8:52 PM
---Advertisement---

अहमदाबाद। भारत विरुद्ध इंग्लंड संघात नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर चौथा कसोटी सामना होत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी (५ मार्च) भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने शतकी खेळी केली. त्याने शतक केल्यानंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष झाला. यावेळी कर्णधार विराट कोहलीनेही आनंद व्यक्त केला आहे, या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

झाले असे की भारताने पहिल्या ३ विकेट्स ४१ धावांवरच गमावल्या होत्या. अशा वेळी रिषभ पंत ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने भारताच्या डावाची जबाबदारी घेत पहिल्यांदा अजिंक्य रहाणेसह ३९, नंतर रोहित शर्मासह ४१ धावांची भागीदारी केली. यानंतर त्याने वॉशिंग्टन सुंदरला साथीला घेत ११३ धावांची भागीदारी रचली आणि बॅकफूटवर पडलेल्या भारताला संकटातून बाहेर काढत आघाडीवर आणले.

त्याने सुरुवातीला अत्यंत सावधपणे फलंदाजी करत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने फलंदाजीचा वेग बदलला आणि त्याने आक्रमक खेळत शतकाच्या दिशेने वाटचाल केली. यावेळी त्याने ८३ व्या षटकात जेम्स अँडरसननला रिव्हर्स स्वीपचा फटका मारत नव्वदीत प्रवेश केला. पुढे ८४ व्या षटकात जो रुटच्या गोलंदाजीवर त्याने खणखणीत षटकार ठोकला आणि कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक ठोकले.

भारतीय कर्णधाराचा जल्लोष

पंतने षटकारासह शतक पूर्ण करताच भारतीय ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंनी टाळ्या वाजवत त्याचे कौतुक केले. दरम्यान विराट तर त्याच्या जागेवरुन उठून पळत भारताच्या ड्रेसिंग रुमच्या बाल्कनीत येऊन टाळ्या वाजवू लागला. त्याच्या या आनंद व्यक्त करण्याच्या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

https://twitter.com/Pran33Th__18/status/1367789345084567555

पंतचा मोठा कारनामा

पंत या शतकासह ३ कसोटी शतके करणारा भारताचा तिसराच यष्टीरक्षक ठरला आहे. याआधी एमएस धोनीने ६ आणि वृद्धिमान साहाने ३ शतके कसोटीत केली आहेत.

पंतला अँडरसनने केले बाद 

भारताच्या पहिल्या डावातील पंतचा झंझावात ८५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अँडरसनने संपवला. अँडरसनने टाकलेल्या चेंडूवर पंत रुटकडे झेल देऊन बाद झाला. पंतने ११८ चेंडूत १३ चौकार आणि २ षटकारांसह १०१ धावा केल्या.

दुसऱ्या दिवसाखेर भारत आघाडीवर 

दुसऱ्या दिवसाखेर भारताने रिषभ पंतच्या शतकाच्या जोरावर ९४ षटकात ७ बाद २९४ धावा केल्या आहेत. सध्या वॉशिंग्टन सुदंर ११७ चेंडूत ६० धावांवर आणि अक्षर पटेल ३४ चेंडूत ११ धावांवर नाबाद आहे. तसेच भारताने ८९ धावांची आघाडी घेतली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

रिषभ पंतचा कहर! स्मिथला मागे टाकत ‘या’ यादीमध्ये आला दुसऱ्या स्थानी

भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात शतक ठोकणारा पंत दुसराच यष्टीरक्षक, अव्वलस्थानी ‘हा’ दिग्गज

‘IPLचा हिशोब कसोटीत पूर्ण करतायत,’ रोहितला बाद देणं पंचांना पडलं महागात; झाले ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---