जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये खेळण्याची इच्छा प्रत्येक क्रिकेटपटू व्यक्त करत असतो. जगभरातील सर्व नामांकित क्रिकेटपटू तसेच अनेक प्रतिभावंत युवा क्रिकेटपटू हे या मोठ्या लीगमधून आपली प्रतिभा जगाला दाखवत असतात. असे असतानाच दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी अष्टपैलू वेन पार्नेल याने आयपीएल व आंतरराष्ट्रीय क्रिकेटची तुलना करताना एक मोठे वक्तव्य केले आहे.
पार्नेल याने एका मुलाखतीत बोलताना नुकतेच आयपीएल व आंतरराष्ट्रीय क्रिकेट यांची तुलना करताना या दोन्हींचा दर्जा एकच असल्याचे म्हटले. तो म्हणाला,
“मी शेवटची आयपीएल 2014 मध्ये खेळलो होतो, जेव्हा तुम्ही प्रत्येक 6 किंवा 7 सामन्यात एकदा 200 धावा होताना पाहत असाल. मात्र, आजकाल संघ जवळजवळ दर दुसऱ्या 200 धावा करत आहेत. विशेष म्हणजे त्या धावांचा पाठलाग देखील होतोय. त्यामुळे फलंदाजांच्या कौशल्याची पातळी वाढली आहे.”
तो पुढे म्हणाला,
“आयपीएल आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या जवळ आहे. जगातील इतर कोणतीही लीग त्याच्या आसपास नाही. ही एक अतिशय कठीण आणि शानदार लीग असून, स्पर्धेची पातळी खूप उच्च आहे.”
पार्नेलने जवळपास 9 वर्षांनी आयपीएल 2023 मध्ये पुनरागमन केले होते. रीस टोपले जखमी झाल्यानंतर पार्नेलचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात समावेश करण्यात आला होता. या दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजाने आयपीएलच्या 16 व्या हंगामात एकूण 7 सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 26.22 च्या सरासरीने एकूण 9 विकेट घेतल्या. तसेच तो आता दक्षिण आफ्रिका संघाचा पुन्हा एकदा नियमित सदस्य झाला असून, भारतात खेळण्याचा अनुभव असल्याने आगामी विश्वचषकासाठी त्याचा दक्षिण आफ्रिका संघात समावेश होऊ शकतो.”
(Wayne Parnell Said IPL Is So Close To International Cricket)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! बाबर आझमकडून आशिया चषकाची वादळी सुरुवात, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
महिला क्रिकेटसाठी ईसीबीचा मोठा निर्णय! पुरुष आणि महिला खेळाडूंना एकसमान मॅच फी