भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना बुधवारी, 25 ऑगस्टपासून सुरू होत आहे. हेडिंग्ले येथे होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येतील. भारत वाढलेल्या आत्मविश्वासाने या सामन्यात उतरेल आणि मालिकेवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे यजमान इंग्लंड संघ विजयासह आपले खाते उघडण्यास इच्छुक असेल. सध्या दुसरा कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे. असे असूनही, दोन्ही संघांमध्ये चुरशीच्या स्पर्धेची आशा आहे.
सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार जो रूटने आपल्या संघाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. रूटने सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आम्ही गेल्या सामन्यातून धडा घेतला आहे आणि आम्ही विनाकारण कोणत्याही वादात पडणार नाही. इंग्लंड संघ यावेळी लक्ष भटकू देणार नाही.”
इंग्लंडच्या कर्णधाराने सांगितले की, “विराटचा संघ त्याच्या स्वतःच्या शैलीत खेळेल. पण आम्ही आमचे सर्वोत्तम देऊ आणि एकसंघ होऊन खेळू. आम्ही आमच्या चुकांमधून शिकलो आहोत. उर्वरित तीन सामन्यांमध्ये आम्हाला बरेच काही करायचे आहे आणि मालिकेत परत येण्यास आम्ही उत्सुक आहोत.”
संघाच्या कमकुवत फलंदाजीवर रूट पुढे म्हणाला की, “आम्हाला आशा आहे की आमचे फलंदाज पुन्हा लयीत येतील आणि चांगली कामगिरी करतील.”
दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहला बाऊन्सर टाकण्याच्या प्रयत्नात इंग्लंडने सामना कसा गमावला? याबद्दल बरेच काही लिहिले आणि बोलले गेले होते. आजी-माजी खेळाडूंनी रूटसह संपूर्ण इंग्लिश संघाला टीकेचे धनी केले होते. सामना संपल्यानंतर रूटने यावर भाष्य करत चूक कबुल केली होती.
भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने पहिला कसोटी सामना अनिर्णित राखला. तर दुसरा सामना रोमहर्षक पद्धतीने 151 धावांनी जिंकला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
अमेरिकेच्या धरतीवर पहिले अर्धशतक! उन्मुक्त चंदने शेअर केला ताबडतोड फलंदाजीचा व्हिडिओ
विराटसेना अजून बळकट! दुखापतीवर मात करत ‘या’ खेळाडूचे पुनरागमन, रहाणेने दिली माहिती