वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने ५९ धावांनी विजय मिळवला. या सामन्यात भारताकडून फलंदाजी करताना यष्टीरक्षक रिषभ पंत याने चांगले योगदान दिले. तर गोलंदाजीत अर्शदीप सिंग, रवी बिश्नोई, अक्षर पटेल यांच्याबरोबर आवेश खान यानेही मोलाचा हातभार लावला. मागील टी२० सामन्यातील सरासरी प्रदर्शनानंतर आवेशने केलेले हे प्रदर्शन कौतुकास्पद होते. परंतु आवेशला खराब फॉर्ममधून बाहेर आणण्यात कर्णधार रोहित शर्मा याचा मोठा हात राहिला आहे. ते कसे, जाणून घेऊ…
वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील २ टी२० सामन्यात अर्थात दुसऱ्या व तिसऱ्या सामन्यात मिळून आवेशने एकच विकेट घेतली होती. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी२० मालिकेतील त्याचा इकोनॉमी रेट १९४ च्या पुढे गेला होता. परंतु आता चौथ्या टी२० सामन्यात थेट २ विकेट्स घेत त्याच्या इकोनॉमी रेटमध्ये चांगलीच सुधारणा झाली आहे. त्याचा टी२० मालिकेतील इकोनॉमी रेट ११ च्याही खाली आला आहे.
आवेशने वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी२० सामन्यात ४ षटके फेकताना फक्त १७ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने ब्रेंडन किंग आणि डिवॉन थॉमस यांच्या महत्त्वपूर्ण विकेट्स मिळवून दिल्या. यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट ४.२५ इतका राहिला आहे. त्याने आपल्या पहिल्या २ षटकांमध्येच या विकेट्स मिळवल्या आहेत.
Two key early wickets by @Avesh_6. His pace is causing all sorts of problems for West Indies.
Watch all the action from the India tour of West Indies LIVE, exclusively on #FanCode 👉 https://t.co/RCdQk12YsM@BCCI @windiescricket #WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/gwk5mhoArG
— FanCode (@FanCode) August 6, 2022
आवेशच्या या ढांसू प्रदर्शनामागे कर्णधार रोहितचा हात आहे. या भारतीय वेगवान गोलंदाजाने याबद्दल खुलासा करताना म्हटले आहे की, “मी गेल्या २ टी२० सामन्यात चांगली गोलंदाजी केली नव्हती. परंतु आता मला जरा हायसे वाटत आहे. मी सामन्यापूर्वी माझ्या गोलंदाजीबद्दल प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्याशी बोललो होतो. त्यांनी मला फक्त ४ शब्दांमध्ये उत्तर दिले होते. आमचा तुला पूर्ण पाठिंबा आहे.”
रोहित आणि द्रविड यांच्या या ४ शब्दांनी आवेशला बळ मिळाले आणि त्याने चौथ्या टी२० सामन्यात दमदार प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून देण्यात योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
उगाचच पंतला म्हणत नाही टॉपचा विकेटकिपर! ‘हा’ मोठा पराक्रम करत कार्तिकला टाकले बरेच मागे
भारतीय कर्णधाराने सामना पाहायला आलेल्या चाहत्यांना दिलं विशेष गिफ्ट, पाहा व्हिडिओ
हर्षल पटेल आशिया चषक खेळणार नाही! भारतीय संघाबाबत मोठी बातमी आली समोर