आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 39 वा सामना रॉयल्स चॅलेंजर्स बेंगलोर आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यात आरसीबीच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यापुढे केकेआरचे फलंदाज अपयशी ठरले. सामन्याआधी तुमच्याकडे योजना असतात पण तुम्हाला खेळाडूंवर विश्वास ठेवावा लागतो, असे आरसीबीचा कर्णधार विराट कोहली म्हणाला. त्याने वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरीस आणि मोहम्मद सिराज यांचे कौतुकही केले.
वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी देण्याचा करत होतो विचार
सामन्यानंतर बोलताना कोहली म्हणाला की, “मी नवीन चेंडूने वॉशिंग्टन सुंदरला गोलंदाजी देण्याचा विचार करत होतो. नाणेफेक गमावला हे चांगलच झालं कारण आम्हीही प्रथम फलंदाजी केली असती. वॉशिंग्टन सुंदर आणि ख्रिस मॉरिस गोलंदाजीला सुरुवात करतील अशी आमची रणनीती होती, पण त्यानंतर नवीन चेंडूने मॉरिस आणि सिराज गोलंदाजी करेल, असा निर्णय आम्ही घेतला.”
खेळाडूंवर ठेवावा लागतो विश्वास
ते म्हणाले, “संघ व्यवस्थापनाने अशी योजना तयार केली होती, ज्यामुळे अचूक रणनीतीने सामन्यात उतरू शकलो. आमच्याकडे प्लॅन ए, प्लॅन बी आणि प्लॅन सी असतो. आम्हाला यापैकी एक योजना अंमलात आणावी लागते. आम्ही लिलावातही काही महत्वपूर्ण निर्णय घेतले, ज्याचा फायदा आम्हाला होत आहे. तुमच्याकडे सर्व योजना असतात पण तुम्हाला तुमच्या खेळाडूंवर विश्वास ठेवावा लागतो.”
मॉरीस आहे उत्साही
कोहलीने मॉरिस आणि सिराज यांचे विशेष कौतुक केले. तो म्हणाला की, “मॉरिस जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडत आहे. तो उत्साही आहे. तो फलंदाजीत, क्षेत्ररक्षणात आणि गोलंदाजीत चांगले योगदान देऊ शकतो.”
सिराजने घेतले कठोर परिश्रम
कोहली म्हणाला, “मागील वर्ष सिराजसाठी कठीण होते आणि त्याच्यावर बऱ्याच टीकाही झाल्या. या हंगामात त्याने कठोर परिश्रम घेतले आणि तो नेटमध्येही चांगली गोलंदाजी करत आहे. याचे उत्तम निकाल दिसत आहेत.”
विराटने सज्ज राहण्यास सांगितले
सामनावीर ठरलेल्या सिराजने कर्णधार कोहलीचे आभार मानले तो म्हणाला की, “विराटने मला नवीन चेंडूने गोलंदाजी दिल्याबद्दल मी त्याला धन्यवाद देऊ इच्छितो. नवीन चेंडूने मी खूप सराव केला. मी नवीन चेंडूने गोलंदाजी करावी अशी अशी आमची योजना नव्हती, पण जेव्हा आम्ही मैदानावर उतरलो तेव्हा विराटने मला तयार राहण्यास सांगितले. रणनीतीप्रमाणे नितीश राणाला बाद केले.”
आरसीबीने केली चांगली गोलंदाजी
सामन्यानंतर केकेआरचा कर्णधार मॉर्गन म्हणाला की, “आम्ही डावाच्या सुरुवातीलाच चार किंवा पाच गडी गमावले. आम्हाला अशी सुरुवात नको होती. ही निराशाजनक बाब होती. आरसीबीने चांगली गोलंदाजी केली. आमच्या फलंदाजांनी त्यांचा उत्तम प्रकारे सामना करायला हवा होता. मैदानावर दव पडेल ही स्तिथी लक्षात घेऊन आम्ही प्रथम गोलंदाजीचा निर्णय घ्यायला हवा होता.”
भारतीय फलंदाजांवर विश्वास दाखवणे महत्वाचे
पुढे बोलताना मॉर्गन म्हणाला, “अव्वल तीन फलंदाजांच्या निवडीमध्ये आम्ही सातत्य राखले आहे. आमचा विश्वास आहे की ते आम्हाला स्पर्धेत पुढे नेऊ शकतात. त्यांनी आपली क्षमता दर्शवली आहे. त्यामुळे भारतीय फलंदाजांवर विश्वास दाखवणे महत्वाचे आहे.”
रसल, नरेन यांची जाणवली कमतरता
तंदुरुस्त नसल्यामुळे आंद्रे रसल आणि सुनील नरेन या सामन्यात खेळू शकले नाहीत. याबद्दल बोलताना मॉर्गन म्हणाला की , “आशा आहे की रसल आणि नरेन पुढील सामन्यात तंदुरुस्त असतील आणि निवडीसाठी उपलब्ध असतील. या दोन महान खेळाडूंची कमतरता आम्हाला जाणवली.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘त्याचा निर्णय समजण्यापलीकडे होता,’ विश्वविजेत्या कर्णधारावर भडकला गौतम गंभीर
कोलकाताच्या फलंदाजांना लोळवणाऱ्या सिराजला विराटने सामन्याआधी दिला होता ‘हा’ खास संदेश
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: पॉवरप्लेमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ गोलंदाज
आयपीएलमध्ये पहिले शतक झळकवण्यासाठी सर्वाधिक डाव खेळलेले ३ भारतीय फलंदाज
आयपीएलमध्ये सलग चार सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करणारे ३ भारतीय फलंदाज