---Advertisement---

या खेळाडूचे धोनीबद्दल मोठे भाष्य, टी२० विश्वचषकात घेऊ शकतो त्याची जागा

On: गुरूवार, ऑक्टोबर 24, 2019 3:31 PM
---Advertisement---

पुढीलवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये टी20 विश्वचषक होणार आहे. या विश्वचषकात भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी खेळणार की नाही यावर अजून प्रश्नचिन्ह आहे. मात्र भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने या टी20 विश्वचषकात धोनी भारतीय क्रिकेटसाठी इतक्यावर्षे निभावत असलेली भूमिका निभावण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

कार्तिक इंग्लंड आणि वेल्समध्ये खेळल्या गेलेल्या 2019विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होता. पण या विश्वचषकात त्याची कामगिरी खराब झाली. त्यामुळे त्याला या विश्वचषकानंतर संघातील स्थानही गमवावे लागले.

सध्या कार्तिक विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळना़डूच्या संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूने अंतिम सामन्यात प्रवेशही केला आहे. तसेच त्याने या स्पर्धेत 11 सामन्यात 407 धावा केल्या आहेत.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवण्याबद्दल कार्तिक ईएसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “2020च्या टी20 विश्वचषकासाठी एक वर्षाचा कालावधी आहे. पण मला वाटते मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली तर मला खात्री आहे मी त्या विश्वचषकात जाऊन खेळेल.’

‘कारण मला वाटते फिनिशर या महत्त्वाच्या जागेच्या शोधात भारतीय संघ आहे आणि त्या जागेवर असे कोणीतरी हवे जे परिस्थिती समजून घेऊ शकतील आणि त्यावेळी चांगली कामगिरी करु शकतील.’

तसेच कार्तिक म्हणाला, ‘मी भारतासाठी छोट्या कालावधीत खेळलेल्या टी20 सामन्यांमध्ये ती भूमिका पार पाडली आहे. पण मी विश्वचषकानंतक भारताकडून खेळलेलो नाही. पण मला वाटते मी मागील अनेक वर्षे धोनी जी भूमिका निभावत आहे ती निभावण्यासाठी तयार आहे.’

‘मला वाटते त्याच्याप्रमाणे मी करु शकतो. मी कोलकता नाईट रायडर्ससाठी आणि तमिळनाडूसाठी ती भूमिका निभावत आहे. त्यामुळे जर ती जागा रिकामी असेल तर मी ती जागा मिळवण्याचा प्रयत्न करेल. मला टी20 विश्वचषक खेळायला आवडेल.’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---