वेस्ट इंडीज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला शुक्रवारी (२२ जुलै) एकदिवसीय मालिकेतील पिहला सामना खेळायचा आहे. वेस्ट इंडीज संघ मागच्या दोन वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये समाधानकारक कामगिरी करू शकला नाहीये. वेस्ट इंडीज संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्सने भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यापूर्वी माध्यमांशी चर्चा केली.
वेस्ट इंडीज संघ मागच्या मोठ्या काळापासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसला आहे. आकडेवारीचा विचार केला, तर वेस्ट इंडीजने २०१९ नतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या ३९ डावांपैकी फक्त ६ डावात संपूर्ण ५० षटके खेळून काढली आहेत. तसेच मागच्या १३ एकदिवसीय मालिकांपैकी ९ मालिका संघाने गमावल्या आहेत. संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स (West indies coach Phil Simmons) माध्यमांशी बोलताना संघातील
सिमन्सच्या मार्गदर्शनातील वेस्ट इंडीज संघाने यावर्षा मायदेशात खेळताना आयर्लंडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. सिमन्सने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “महत्वाचे हे आहे की, आम्ही पूर्ण ५० षटके कशी फलंदाजी करतो. आम्हाला डावा आणि भागीदारी सांभाळून संपूर्ण ५० षटके फलंदाजी करावी लागेल.”
सिमन्स २०१९ मध्ये वेस्ट इंडीज संघाचे मुख्य प्रशिक्षक बनले आणि तेव्हापासून संघाला मार्गदर्शन करत आले आहेत. भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत (India vs West Indies) अनुकूल खेळपट्टीचा फायदा वेस्ट इंडीजला अधिक होईल, असे सिमन्सला वाटते. ते म्हणाले की, “आम्हाला जेवढी चांगली खेळपट्टी मिळेल, तेवढेच आमच्या फलंदाजांसाठी आणि गोलंदाजांसाठी चांगले असेल.”
“गोलंदाजी आणि श्रेत्ररक्षणात सतत सुधार होत आहे. क्षेत्ररक्षणात आम्ही आमच्या संघाला अव्वल दर्जाचा मानतो. आमचे गोलंदाज चांगली गोलंदाज करत आहेत. त्यांनी धावांवर अंकुश लावण्यावर आणि विकेट्स घेण्यावर लक्ष द्यावे लागेल. असे करूनच आम्ही विरोधी संघाला, कमी धावसंख्येवर बाद करून विजय मिळवू शकतो,” असेही सिमन्स पुढे म्हणाले.
दरम्यान, उभय संघातील या एकदिवसीय मालिकेत शिखर धवन भारताचे नेतृत्व करणार आहे. भारताच नियमित कर्णधार रोहित शर्मा विश्रांतीवर असल्यामुळे धवनकडे ही जबाबदारी सोपवली गेली आहे. जसप्रीत बुमराह आणि विराट कोहील वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय पाठोपाठ टी-२० मालिकेत देखील विश्रांतीवर असतील.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बीसीसीआयचे ८६.२१ कोटी देण्यास बायजूसचा नकार?, पेटीएमही सोडणार स्पॉन्सरशिप, वाचा संपूर्ण प्रकरण
INDvWI: ‘गुरु’ द्रविड यांचा मास्टर स्ट्रोक! नेटमध्ये चक्क लोकल गोलंदाजाकडून करून घेतली गोलंदाजी
VIDEO | एक टप्पा आउट! कुटुंबातील लहान सदस्यांना शेवटपर्यंत नाही बाद झाला मोहम्मद कैफ