वेस्ट इंडीज क्रिकेट संघात मोठा बदल होणार आहे. मागच्या वर्षी आयसीसी टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला. या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीजचे प्रदर्शन अपेक्षेपेक्षा खूपच खराब राहिले. निकोलस पुरन याच्या नेतृत्वातील हा संघ पहिल्याच फेरीतून बाहेर पडला. याच पार्श्वभूमीवर क्रिकेट वेस्ट इंडीजने इंग्लंड संघाच्या पावलावर पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काळात लाल आणि पाढऱ्या चेंडूच्या क्रिकेटसाठी वेस्ट इंडीजकडे दोन वेगवेगळे प्रशिक्षक असतील.
क्रिकेट वेस्ट इंडीजचे डायरेक्टर जिमी एडम्स () यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात त्यांचा संघ कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे प्रशिक्षक नियुक्त करणार आहे. माध्यमांशी चर्चा करताना एडम्स म्हणाले, “सध्याच्या मुख्य प्रशिक्षकांकडे पाहता असे वाटते की या पदासाठी दो वेगवेगळे प्रशिक्षक गरजेचे आहेत. लाल चेंडू आणि पांढरा चेंडू या दोन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे प्रशिक्षक असणे गरजेचे वाटत आहे.”
“एकापाठोपाठ एक वेगवेगळ्या प्रकारांमधीली दौऱ्यांची संख्या वाढत आहे. अशात एका व्यक्तिकडून योग्य निर्णयांच्या अपेक्षा ठेवणे कठीण आहे. त्या एकाच व्यक्तिला द्विपक्षीय मालिका, फ्रँचायजीची तयारी आणि रणनीती या सर्वा गोष्टींवर लक्ष द्यावे लागते,” असेही एडम्स म्हणाले. क्रिकेट वेस्ट इंडीजने दिलेल्या माहितीनुसार मुख्य प्रशिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. बोर्डाने असेही असेही सांगितले की, जो प्रशिक्षक कसोटी संगासाठी नियुक्त केला जाईल, त्याने वेस्ट इंडीज अ संघालाही मार्गदर्शन करायचे आहे. प्रशिक्षकपद वाटून दिल्यामुळे खेळाडूंच्या प्रदर्शनावर अधिक लक्ष देता याईल, असे जिमी एडम्स यांना वाटते.
दरम्यान, मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात वेस्ट इंडीजने सुमार प्रदर्शन केल्यानंतर फिल सिमंस यांनी संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. या विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीजला विजयासाठी स्कॉटलंडकडून 161 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पण त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या 118 धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतरच्या सामन्यात वेस्ट इंडीजला 154 धावांचे लक्ष्य मिळाले आणि त्यांनी ते गाठले देखील. पण आयर्लंड आयर्लंडवरिुद्धचा सामना गमावल्यानंतर वेस्ट इंडीज विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच फेरीतून बाहेर पडला.
विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वेस्ट इंडीजला दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभव मिळाला. नंतर जिम्बाब्वेला वेस्ट इंडीजने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0ने पराभूत केले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत संघाला 0-2 असा पराभव मिळाला. विश्वचषक संपल्यानंतर वेस्ट इंडीजने एकही मर्यादित षटकांचा एकही सामना खेळला नाहीये.
(West Indies team will now appoint different coaches in red ball and white ball cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीप्रेमींसाठी रैनाने दिली आनंदाची बातमी, आयपीएल 2024मध्येही खेळणार थाला?
’15 वर्षात एकही ट्रॉफी जिंकली नाही…’, विराटशी संवाद केल्यानंतर महिला आरसीबीने जिंकला पहिला सामना