वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलेल्या इंग्लंड संघाला यजमान संघासोबत ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळायचीये. यातील पहिला सामना अनिर्णित राहिलाय. सध्या उभय संघात दुसरा कसोटी सामना बार्बाडोस येथे खेळला जात आहे. दुसऱ्या सामन्यात इंग्लंड संघ मजबूत दिसत आहे. कर्णधार जो रूटच्या दमदार शतकाच्या जोरावर संघाने ९ विकेट्स गमावत ५०७ धावांवर डाव घोषित केला. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपण्यापर्यंत वेस्ट इंडिज संघाने १ विकेट गमावत ७१ धावा केल्या होत्या. रूटने वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या कसोटीत दीडशतकी खेळी करत एका खास विक्रमावर आपले नाव कोरले आहे.
दुसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान इंग्लंडकडून २ शतकी खेळी पाहायला मिळाल्या. एक म्हणजे बेन स्टोक्सची (Ben Stokes) आणि दुसरी म्हणजे कर्णधार जो रूटची (Joe Root). स्टोक्सने कर्णधाराची साथ देत १२० धावांची अफलातून खेळी केली. या धावा करताना त्याने ६ षटकार आणि ११ चौकारही ठोकले. सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने ३ विकेट्स गमावत २४४ धावा केल्या होत्या, तर दुसऱ्या दिवशी ५०७ धावांवर डाव घोषित केला. या डावादरम्यान १५०पेक्षा अधिक धावांची खेळी करत जागतिक विक्रम रचला.
Joe Root’s wonderful innings comes to an end.
🏏 153 runs from 316 balls.
☝️ Dismissed lbw by Roach.#WTC23 | #WIvENG | https://t.co/bnf0fU7dtG pic.twitter.com/tNPge4fUYY— ICC (@ICC) March 17, 2022
जो रूटचा जागतिक विक्रम
वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना जो रूटने १५३ धावा ठोकल्या. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतील १२ वे दीडशतक होते. या डावासोबतच त्याने अनेक दिग्गजांना मागे सोडले आहे. इंग्लंडकडून माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने ११ वेळा कसोटीत १५०पेक्षा धावांची खेळी केली होती. याव्यतिरिक्त वाली हेमंड, लिओनार्ड हटन आणि केविन पीटरसन यांनी प्रत्येकी १० वेळा हा कारनामा केला होता.
सध्या सक्रिय फलंदाजांमध्ये जो रूट सर्वात आघाडीवर आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीनेही १० वेळा कसोटीत १५०पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन यांनी प्रत्येकी ८ वेळा हा कारनामा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हैदराबादने १०.७५ कोटींना विकत घेतलेला पूरन आयपीएलमध्ये धमका करण्यास सज्ज, वाचा काय म्हणाला
IPL 2022 | मुंबई इंडियन्ससह ‘हे’ दोन संघ देऊ शकतात धोनीच्या सीएसकेला कडवी टक्कर
ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल बनला भारताचा ‘जावईबापू’, लग्नाचे PHOTO आले समोर