वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघातील दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद येथील पोर्ट ऑफ स्पेन मैदानावर खेळला जात आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पहिला डाव संपुष्टात आला. यावेळी भारतीय संघाने सर्व विकेट्स गमावत 438 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 1 विकेट गमावत 86 धावा केल्या. वेस्ट इंडिजसाठी कर्णधार क्रेग ब्रेथवेट आणि किर्क मॅकेंझी नाबाद परतले. सध्या वेस्ट इंडिज संघ भारताच्या आव्हानापासून 352 धावा मागे आहे.
यजमानांची पहिली विकेट
वेस्ट इंडिज संघाकडून डावाची सुरुवात करणारा सलामीवीर तेजनारायण चंद्रपॉल 95 चेंडूंचा सामना करून 33 धावांवर बाद झाला. त्याला रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने 35व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर आर अश्विन (R Ashwin) याच्या हातून झेलबाद केले. चंद्रपॉलने सलामीवीर क्रेग ब्रेथवेट (Kraigg Brathwaite) याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी रचली.
West Indies fight back after Virat Kohli brought up his century early on Day 2.
📝 #WIvIND: https://t.co/4hUd6BPlKw#WTC25 pic.twitter.com/YSVsxIT6iX
— ICC (@ICC) July 21, 2023
भारतीय संघाचा पहिला डाव
तत्पूर्वी भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 438 धावांचा मोठा डोंगर उभा केला. भारताकडून विराट कोहली (Virat Kohli) याने शतक झळकावले. विराटने 206 चेंडूंचा सामना करताना 121 धावांचा पाऊस पाडला. त्यामध्ये 11 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त रोहित शर्मा, यशस्वी जयसवाल, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी अर्धशतक झळकावले. रोहितने 80, जयसवालने 57, जडेजाने 61 आणि अश्विनने 56 धावांचे योगदान दिले.
विंडीजची गोलंदाजी
वेस्ट इंडिज संंघाकडून गोलंदाजी करताना केमार रोच आणि जोमेल वॉरिकन यांनी प्रत्येकी 3 विकेट्स आपल्या नावावर केल्या. तसेच, जेसन होल्डर यानेही 2 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त शॅनन गॅब्रियल यानेही 1 विकेट घेतली.
मालिका जिंकण्यावर भारताच्या नजरा
भारताच्या 438 धावांचा पाठलाग करताना यजमानांनी 1 विकेट गमावत 86 धावा केल्या आहेत. अशात भारतीय गोलंदाज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिज संघाच्या पटापट विकेट्स घेण्याचा प्रयत्न करतील. तसेच, यजमानांचे लक्ष मोठ्या आव्हानावर असेल. वेस्ट इंडिज संघ पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करेल. या मालिकेविषयी बोलायचं झालं, तर भारत या मालिकेत 1-0ने आघाडीवर आहे. भारताने पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजला 1 डाव आणि 141 धावांनी पराभूत केले होते. (west indies vs india port of spain ind vs wi 2nd test know here about 2nd day)
महत्त्वाच्या बातम्या-
ऍशेस 2023: मॅंचेस्टर कसोटीवर इंग्लंडची मजबूत पकड, बॅझबॉल फलंदाजीनंतर गोलंदाजांचा कहर
शतक एक विक्रम अनेक! लाजवाब शतकासह किंग कोहली रेकॉर्ड बुकमध्ये