सबीना पार्कमध्ये वेस्टइंडीज आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील ३ दिवसाचा खेळ झाला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाकिस्तानने ४ विकेट गमावत २१२ धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. त्यानंतर तिसऱ्या दिवशी २१२ धावांपासून पुढे खेळताना पाकिस्तानने ३०९ धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात वेस्टइंडीज संघ ३ विकेट्स ३९ धावांवर आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर असे आही घडले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वेस्टइंडीज क्रिकेटने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जेसन होल्डर पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानला स्लेज करताना दिसत आहे. होल्डर त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. व्हिडिओत दिसत आहे की, जेव्हा रिजवान मैदानात फलंदाजी करायला येतो; तेव्हा होल्डरने त्याच्यावर दबाव बनवण्यासाठी त्याला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान होल्डर गोलंदाज काइल मेयर्सला आठवण करून देतो की रिजवान मागच्या सामन्यात कशाप्रकारे बाद झाला होता.
पहिल्या सामन्यात होल्डरने चेंडू बाहेरच्या बाजूने टाकला होता आणि रिजवान मोठा शाॅट खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला होता. असे असले तरी, दुसऱ्या सामन्याच्या सुरुवातीला होल्डरने केलेल्या स्लेजिंगचा रिजवानवर काही परिणाम झालेला दिसला नाही. त्याने उत्तम फलंदाजी करत ११५ चेंडूत ३१ धावा केल्या. अखेर ९२ व्या षटकात होल्डरला त्याची विकेट घेण्यात यश आले.
Jason Holder keeping things positive and chirpy on a hot, sweltering day! #WIvPAK #MenInMaroon pic.twitter.com/vImeg69X8y
— Windies Cricket (@windiescricket) August 20, 2021
दुसऱ्या सामन्याच्या सुरूवातीच्या दोन दिवसात वेस्टइंडीज संघाचे पारडे जड दिसत होते. वेस्टइंडीजने पाकिस्तानचे तीन महत्वाचे फलंदाज बाद केले केले होते. यामध्ये आबिद अली १ धाव, इमरान बट १ धाव आणि अजहर अली शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार बाबर आजम आणि फवाद आलम यांनी संघाचा डाव सावरला. त्यांनी १५८ धावांची भागीदारी करत संघालै मजबूती देण्याचे काम केले. सामन्यात रंग तेव्हा आला जेव्हा फवाद आलमने १२४ धावांची शतकी खेळी. त्याच्या योगदानामुळेच पाकिस्तानला ३०२ धावा फलकावर नोंदवत्या आल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
‘हिटमॅन’ रोहित षटकारांच्या विक्रमात दिग्गज कपिल देव यांना पछाडणार, ठोकावा लागणार फक्त…
अनुभवहीन भारतीय शिलेदारांची हेडिंग्लेवर ‘खरी कसोटी’; सर्व ११ खेळाडू करणार डेब्यू
‘परफ्यूम बाॅल’ नक्की आहे तरी काय? ज्याने नेपाळचा गोलंदाज गुलशन झाचे पालटले नशीब