---Advertisement---

दुसऱ्या वनडेसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

On: बुधवार, डिसेंबर 18, 2019 1:17 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। आज(18 डिसेंबर) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात दुसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाने 11 जणांच्या संघात एक बदल केला आहे. भारताने शिवम दुबे ऐवजी शार्दुल ठाकूरला 11 जणांच्या संघात संधी दिली आहे.

तसेच वेस्ट इंडिज संघाने 11 जणांच्या संघात 2 बदल केले आहेत. या सामन्यासाठी वेस्ट इंंडिज संघाने आजच्या सामन्यासाठी 11 जणांच्या संघात एव्हिन लूइसला सुनिल अँब्रिस ऐवजी तर ख‌ॅरी पिएरला हेडन वॉल्श ज्यूनियर ऐवजी संधी दिली आहे. पिएरचा हा पदार्पणाचा वनडे सामना आहे.

आजचा सामन्यात विजय मिळवून वेस्ट इंडिजचा संघ 3 सामन्यांच्या या मालिकेत विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. तसेच 17 वर्षांनंतर भारतात वनडे मालिका खिशात घालण्याचाही त्यांचा प्रयत्न असेल. त्यांनी या मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे.

त्याचबरोबर भारतीय संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून मालिकेत बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

असे आहेत 11 जणांचे संघ –

भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केदार जाधव, रवींद्र जडेजा, दीपक चाहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव

वेस्ट इंडिज – शाय होप (यष्टीरक्षक), एव्हिन लुईस, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन, रोस्टन चेस, कायरन पोलार्ड (कर्णधार), जेसन होल्डर, कीमो पॉल, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल, खॅरी पिएर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---