गुरुवारी (20 जुलै) वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघात त्रिनिदाद येथे दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे सुरू झाला. या सामन्यात यजमान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडीज संघाने या सामन्यात दोन बदल केले. भारतीय संघाने दुखापतग्रस्त शार्दुल ठाकूर याच्या जागी मध्यमगती गोलंदाज मुकेश कुमार याला पदार्पणाची संधी दिली. हा सामना दोन्ही देशांच्या दरम्यानचा शंभरावा कसोटी सामना आहे. तसेच, भारताचा प्रमुख फलंदाज विराट कोहली 500 वा आंतरराष्ट्रीय सामना म्हणून या सामन्यात उतरेल.
वेस्ट इंडिज (प्लेइंग इलेव्हन): क्रेग ब्रेथवेट(कर्णधार), टॅगेनारिन चंदरपॉल, किर्क मॅकेन्झी, जर्मेन ब्लॅकवुड, ऍलिक अथनाझे, जोशुआ दा सिल्वा(यष्टीरक्षक), जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, केमार रोच, जोमेल वॅरिकन, शेनॉन गॅब्रिएल
भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, जयदेव उनाडकट, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज.
(West Indies Won Toss And Elected Bowl First Mukesh Kumar Makes Debute For India)
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानच्या माजी खेळाडूने भारताविरुद्ध ओकली गरळ! म्हणाला, ‘जर आम्ही ओव्हलमध्ये जिंकू शकतो, तर…’
Ashes 2023 । ख्रिस वोक्सने घेतलं विकेट्सचं पंचक! दुसऱ्या दिवशी 18 धावां करून ऑस्ट्रेलिया सर्वबाद