वनडे मालिकेच्या अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर रोमांचक विजय मिळवला. होळीच्या एक दिवस आधी झालेल्या या थरारक सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवला. मात्र, तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, १६ वर्षापूर्वी देखील योगायोगाने भारतीय संघासोबत अशी घटना घडली होती. विशेष म्हणजे विरोधी संघाच्या आठव्या क्रमांकावर फलंदाजाने ८० पेक्षा जास्त धावा केल्या होत्या आणि तो सामनादेखील भारताने ७ धावांनी जिंकला होता.
असा आहे योगायोग
सोळा वर्षापूर्वी घडलेल्या त्या घटनेविषयी जाणून घेण्याआधी रविवारच्या सामन्यातील आकडेवारी माहीत करून घेऊया. या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला. मात्र, इंग्लंडचा आठव्या क्रमांकावर फलंदाज सॅम करनने ८३ चेंडूत ९५ धावा फटकावल्या. ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याने शर्थीचे प्रयत्न करूनही इंग्लंडच्या पदरी निराशा पडली.
सन २००५ मध्ये सोळा वर्षापुर्वी कोलंबो येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यादरम्यान ही असेच काहीसे घडले होते. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना युवराज सिंगच्या ११० व मोहम्मद कैफच्या ८३ धावांच्या जोरावर वेस्ट इंडीजसमोर २६३ धावांचे लक्ष ठेवलेले. त्याचा पाठलाग करताना १९५ धावांवर ७ गडी गमावली होते. मात्र, आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या यष्टीरक्षक दिनेश रामदिनने ८३ चेंडूत नाबाद ७४ धावा बनविलेल्या. तरीही, वेस्ट इंडीजला हा सामना ७ धावांनी गमवावा लागला होता.
हा अजब योगायोगच आहेत की, भारताने दोन्ही सामने ७ धावांनी जिंकले, दोन्ही सामन्यात आठव्या क्रमांकावरील फलंदाजाने ८४ चेंडू खेळले आणि तो फलंदाज नाबाद देखील राहिला.
महत्त्वाच्या बातम्या –
अन् दहा वर्षापूर्वीच्या धोनीच्या टीम इंडियाचा बदला विराटच्या टीम इंडियाने पूर्ण केला
व्हिडिओ : “मोहाला करा मित्र आणि…”, आयपीएलच्या जाहिरातीत दिसला रोहित शर्माचा हटके अंदाज
कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमनाबद्दल भुवनेश्वर कुमार म्हणाला, ‘माझे ध्येय कसोटीमध्ये परत येणे आहे, पण…






