---Advertisement---

“करारबद्ध खेळाडू असताना बीसीसीआयने वेदाशी कोणताही संपर्क साधलेला नाही”, लिसा स्थळेकरने फटकारले

On: शनिवार, मे 15, 2021 10:41 PM
---Advertisement---

भारताचा सध्या कोरोना व्हायरसचा विळखा पडला आहे. यात लाखो लोक रोज अडकताना दिसत आहेत. यात अनेक क्रिकेटपटू आणि त्यांच्या कुटुंबाचाही समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णामुर्तीच्या कुटुंबावरही मोठे दु:ख कोसळले. तिच्या आईचे आणि बहिणीचे काही २ आठवड्यांच्या अंतराने काहीदिवसांपूर्वी निधन झाले. तिच्याबाबतीत घडलेल्या या घटनेची आठवण करुन देत ऑस्ट्रेलियाची माजी कर्णधार लिसा स्थळेकरने बीसीसीआयला फटकारले आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी वेदाचा भारतीय संघात समावेश नाही
पुढील महिन्यात भारतीय महिला संघ कसोटी, वनडे आणि टी२० सामन्यांच्या मालिका खेळण्यासाठी इंग्लंडला जाणार आहे. या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय महिला संघात वेदाला संधी देण्यात आलेली नाही. याबाबत लिसा स्थळेकरने ट्विट केले आहे.

लिसा स्थळेकरने बीसीसीआयला फटकारले 
लिसाने ट्विट केले आहे की ‘अगामी मालिकांसाठी वेदाची निवड करण्यात आलेली नाही. कदाचीत त्यांच्या दृष्टीने ही योग्य गोष्ट असेल. पण राग येण्यासारखी गोष्ट अशी की ती करारबद्ध खेळाडू असताना बीसीसीआयने तिच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. बीसीसीआयने ती सध्या कोणत्या गोष्टींचा सामना करत आहे, याचीही विचारपूस केलेली नाही.’

लिसा पुढे म्हणाली, ‘एक चांगल्या असोसिएशनने खेळाडूंची चांगल्या प्रकारे काळजी घ्यायला हवी. त्यांनी कशाचीही पर्वा न करता केवळ सामन्यांवरच लक्ष देऊ नये. ही गोष्ट खूप निराशाजनक आहे. माजी खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन प्रत्येक दिवशी आमच्याशी संपर्क साधत आमची चौकशी करत असतात. भारतात जर खेळाडूंच्या असोसिएशनची गरज असेल तर त्यासाठी योग्य वेळ हीच आहे. या साथीच्या रोगाच्या काळात अनेक खेळाडू दबाव, चिंता, भीती आणि दु:ख अशा भावना अनुभवत असतील. ज्याचा परिणाम त्यांच्यावर वैयक्तिकरित्या होऊ शकतो आणि परिणामत: खेळावर परिणाम होऊ शकतो.’

२८ वर्षीय वेदा सध्या दु:खातून सावरत असून सोशल मीडियामार्फत लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

वेदाची कामगिरी
वेदाही भारतीय महिला संघाची नियमित सदस्य आहे. तिने २०११ साली भारतीय संघात पदार्पण केले होते. तिने आत्तापर्यंत ४८ वनडे आणि ७६ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. वनडेमध्ये तिने ८२९ धावा केल्या. तर आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये तिने ८७५ धावा केल्या आहेत.

इंग्लंड दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ – मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव.

इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेसाठीचा भारतीय संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, रिचा घोष, हरलीन देओल, स्नेह राणा, तानिया भाटीया, इंद्राणी रॉय, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त, राधा यादव, सिमरन दिल बहाद्दूर.

महत्त्वाच्या बातम्या –

कोरोना विरोधी लढ्यासाठी इरफान पठाणचा पुन्हा पुढाकार! ‘ही’ संपूर्ण कमाई करणार दान

‘तुम्हीच पैसे का देत नाही?’, असा प्रश्न विचारत ट्रोल करण्याऱ्याला हनुमा विहारीने चांगलेच खडसावले

कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी उत्सुक नसल्याच्या अफवेवर भुवनेश्वर संतापला, ट्विट करत सुनावले खडे बोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---