WPLच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाने स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखाली महिला प्रीमियर लीग 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. तसेच बंगळुरूने विजेतेपदाच्या सामन्यात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आहे. यानंतर विराट कोहलीने व्हिडिओ कॉल करून महिला संघाचे अभिनंदन देखील केले होते. याबाबत स्मृती मंधानाने विजयानंतर विराट कोहलीसोबत व्हिडिओ कॉलवर काय चर्चा झाली यावर खुलासा केला आहे.
याबरोबरच महिला प्रीमियर लीगमधील दुसऱ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरले आहे. तसेच वुमन्स संघाने आरसीबीचा तब्बल 17 वर्षांचा दुष्काळ संपवला म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मेन्स संघाला आतापर्यंतच्या 16 हंगामात एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. मात्र वुमन्स संघाने दुसऱ्याच हंगामात ट्रॉफी जिंकत इतिहास रचला आहे.
अशातच महिला संघाची कर्णधार स्मृती मानधना हिने व्हिडिओ कॉलवरील संभाषणाबद्दल सांगितले की, “आवाजामुळे मला विराट भैया काय बोले हे मला नीट ऐकू आले नाही. गेल्या 16-17 वर्षांपासून विराट कोहली फ्रँचायझीसोबत काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायला मिळाला.” विराट कोहलीच्या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
https://twitter.com/kukreja_ravii/status/1769416061018116267
दरम्यान अंतिम सामन्यात प्रथम बॅटींग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाचा डाव 113 धावांवर संपुष्टात आला होता. यावेळी दिल्ली संघाकडून शफाली वर्मा हिने सर्वाधिक 44 धावांची आक्रमक खेळी केली होती. तसेच आरसीबी संघाकडून सोफी मोलिनक्सने तीन विकेट आणि श्रेयांका पाटील हिने चार विकेट घेतल्या आहेत. यानंतर दिल्ली संघाच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबी संघाने 19 व्या ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर विजयी चौकार मारत सामना जिंकत इतिहास रचला आहे. यामध्ये आरसीबीकडून स्मृती मंधाना हिने 31 धावा तर सोफी डिव्हाईन 32 धावा आणि एलिस पेरी नाबाद 35 धावा आणि रिचा घोष नाबाद 17 धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- ट्रॉफी जिंकल्यानंतर बॉयफ्रेंडसोबत दिसली स्मृती मानधना? व्हायरल फोटोमधील ‘हा’ व्यक्ती कोण?
- चॅम्पियन बनल्यानंतर विजय माल्ल्यानं केलं आरसीबीचं अभिनंदन, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल