‘विंक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिया प्रकाश वारियर यापूर्वी अनेकदा चर्चेत आली आहे. मल्याळम चित्रपटातील एका सीनने ती ‘राष्ट्रीय क्रश’ बनली असून तिला भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे. आपल्या अभिनयाने सर्वांना घायाळ करणारी ही अभिनेत्री स्वत क्रिकेटची चाहती आहे. त्यातही जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग तिला फार आवडते. पण आयपीएलच्या ८ संघांपैकी तिचा आवडता संघ कोणता? हे फार क्वचित जणांना माहिती असेल.
प्रियाला ही क्रिकेटमध्ये आहे रस
प्रिया प्रकाश सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून ती तिच्या आयुष्याशी संबंधित गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने या आधीच सांगितले आहे की, तिला क्रिकेटमध्ये खूप रस आहे. आता प्रियाने आणखी एका गोष्टीचा खुलासा सोशल मीडियाद्वारे केला आहे.
प्रियाचा आवडता आयपीएल संघ
प्रिया प्रकाशने इंस्टाग्रामवर प्रश्नोत्तर सत्र आयोजित केले होते. याचदरम्यान एका चाहत्याने तिला आवडत असणारा आयपीएलमधील संघ कोणता आहे?, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देत प्रिया प्रकाशने लिहिले की, ‘चेन्नई सुपर किंग्ज.’
चेन्नई सुपर किंग्ज संघ आवडण्याचे कारण?
प्रिया प्रकाशने यापूर्वी एका मुलाखतीत म्हटले होते की, एमएस धोनी तिचा आवडता क्रिकेटपटू आहे. त्यामुळे तिने चेन्नई सुपर किंग्ज हा संघ तिला आवडतो असे सांगितले असावे.
ओरू अदार लव सिनेमामुळे झाली प्रसिद्ध
साल २०१९ मध्ये एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. तो प्रिया प्रकाश वारियरचा होता. या व्हिडिओत मल्याळम चित्रपट ‘ओरू अदार लव’मधील सीन होता, जो खूप व्हायरल झाला होता. यामध्ये ती चित्रपटातील अभिनेत्याला डोळा मारताना दिसत होती. त्या व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांनी तिच्यावर उघडपणे प्रेमाचा वर्षाव केला होता.
प्रिया बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे
प्रिया प्रकाश वारियर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या जीवन चरित्र ‘श्रीदेवी बंगला’मध्ये सर्वांना दिसून येणार आहे. हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
‘थाला’चा सीएसके संघ ‘या’ दिवशी युएईला भरणार उड्डाण, सीईओ विश्वनाथन यांनी दिली माहिती
मॅन ऑन मिशन! सूर्यकुमार अन् पृथ्वीची इंग्लंडमध्ये ‘लँडिग’, जाणून घ्या कधीपासून सुरू करणार सराव?
ENGvIND: अष्टपैलू २ तर वेगवान गोलंदाज ४, टीम इंडियाविरुद्ध ‘असा’ असेल जो रूटचा संघ