भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज बांगलादेशविरुद्ध शुक्रवारी (15 सप्टेंबर) जबरदस्त फॉर्ममध्ये होते. गिलने या सामन्यात संघासाठी शतक ठोकले. पण भारताला विजय मिळाला नाही. बांगलादेशने हा सामना 6 विकेट्सने जिंकला. पराभवानंतर शुमबन गिल माध्यमांशी चर्चा करण्यासाठी आला. यावेळी त्याने श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना जिंकण्याचे महत्व समजावून सांगितले.
आशिया चषक 2023 संपल्यानंतर भारतीय संघाला मायदेशात वनडे विश्वचषक खेळायचा आहे. विश्वचषकात चांगले प्रदर्शन करण्यासाठी रविवारी (17 सप्टेंबर) श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवणे महत्वाचे आहे, असे शुबमन गिल (Shumban Gill) याला वाटते. शुक्रवारी (15 सप्टेंबर) बांगलादेशविरुद्धच्या पराभवामुळे आशिया चषकाच्या अंतिम सामन्यावर काहीच फरक पडणार नव्हता. कारण भारत आणि श्रीलंका संघ आधीच अंतिम सामन्यात पोहोचले होते. पण बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघावार टीका मात्र झाली.
शुमबन गिल माध्यमांसमोर आल्यानंतर त्याला आशिया चषकाच्या अंतिम सामन्याविषयी प्रश्न विचारला गेला. गिल म्हणाला, “आमच्यासाठी आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकणे महत्वाचे आहे. कारण संघाला जिंकण्याची सवय झाली पाहिजे. योग्य वेळी फॉर्म मिळवणे आणि योग्य वेळी लयीत येणे महत्वाचे आहे. विजयाची लय सुरू राहिली पाहिजे. कारण एक दोन पराभव मिळाल्यानंतर संघ दबावात येऊ शकतो. आशिया चषक जिंकला तर आमची लय कायम राहील आणि विश्वचषकाआधी संघाचा आत्मविश्वास देखील वाढेल.”
दरम्यान, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात गिलने 133 चेंडूत 121 धावांची सर्वोत्तम खेळी केली. मात्र, भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकात 8 विकेट्सच्या नुकसानावर 265 धावा कुटल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 49.5 षटकात 259 धावांवर सर्वबाद झाला. शाकिब अल हसन सामनावीर ठरला. कर्णधाराने बांगलादेशसाठी 85 चेंडूत 80 धावा केल्या. सोबतच गोलंदाजाच्या रुपात एक विकेट देखील घेतली. (What makes Asia Cup important for India? Shumban Gill linked it to World Cup)
महत्वाच्या बातम्या –
‘या’ दोन्हींपैकी एक संघ जिंकणार वनडे विश्वचषक! माजी श्रीलंकन कर्णधाराची भविष्यवाणी
श्रीलंकन युवा दुकली ठरतेय आशिया कपमध्ये यशस्वी! पाहा टॉप फाईव्ह गोलंदाजांची यादी