रविवारपासून (२६ डिसेंबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सेंच्युरियनच्या (Centurion) मैदानावर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांनी मिळून भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. दरम्यान पहिल्या दिवसाच्या( २६ डिसेंबर) समाप्तीनंतर मयांक अगरवाल याने केएल राहुल सोबत केलेल्या रणनीतीचा खुलासा केला आहे.
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या दिवसाखेर ३ बाद २७२ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये केएल राहुल नाबाद १२२, तर अजिंक्य रहाणे ४० धावा करत खेळपट्टीवर टिकून आहे. तसेच पहिल्या दिवशी मयांक अगरवालने देखील ६० धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. मयंक आणि राहुल यांनी सलामीला ११७ धावांची भागीदारी केली.
दरम्यान, पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर मयांक अगरवालने म्हटले की, “आमची योजना अशी होती की, जे चेंडू स्टंपच्या जवळ येत आहेत, तेच खेळायचे आणि जितके चेंडू बाहेर जातील तितके सोडायचे.”(Mayank Agarwal statement)
अधिक वाचा – दक्षिण आफ्रिका गाजवणाऱ्या ‘टॉप ३’ जोड्यांमध्ये सामील झाले मयंक-राहुल
तसेच तो पुढे म्हणाला की, “३ गडी बाद २७२ धावा पहिल्या दिवशी करण्याचे श्रेय आमच्या फलंदाजांना जाते. आमची योजना अशी होती की, जो कोणी फलंदाज खेळपट्टीवर असेन तो टिकूनच राहील आणि राहुलने (Kl Rahul) तसेच केले. राहुलचे शतक खूप महत्वाचे होते. आम्ही भागीदारी केली, ती देखील महत्वाची होती. त्याने आधी माझ्यासोबत भागीदारी केली, त्यानंतर विराट भाई सोबत आणि मग रहाणेसोबत. मला आशा आहे की तो असेच खेळणे सुरू ठेवणार.”
“भारतीय संघाने सामन्यापूर्वी सराव सत्रात भरपूर वेळ घालवला आहे. कारण परिस्थितीचा अंदाज आला पाहिजे. आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याच्या प्रयत्नात असणार आहे कारण, आम्हाला एका मजबूत स्थितीत यायचं आहे. दुसऱ्या दिवसाचा (२७ डिसेंबर) पहिला तास खूप महत्वाचा असणार आहे. आम्हाला जर दुसऱ्या दिवशी चांगली कामगिरी करता आली, तर आम्ही त्यांना दबावात आणू शकतो,” असे मयांक अगरवाल म्हणाला.
महत्वाच्या बातम्या :
हर्षा भोगलेंनी निवडली ‘टेस्ट टीम ऑफ द इयर’! ‘या’ तिघा भारतीयांची लागली वर्णी
गांगुली की धोनी? सर्वोत्तम कर्णधाराच्या प्रश्नावर भज्जी म्हणाला…
हे नक्की पाहा : त्या दिवशी विराटने शतक केलं अन् गंभीरने दिली भारी भेट