बर्मिंगहॅम। आजपासून(1 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका सुरु होणार आहे. ही 71 वी ऍशेस मालिका आहे. दोन वर्षांच्या अंतराने खेळली जाणारी ही स्पर्धा क्रिकेटजगतात लोकप्रिय आहे.
137 वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या ऍशेज मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये नेहमीच कडवी झुंज पहायला मिळते. या स्पर्धेत आत्तापर्यंत 330 कसोटी सामने खेळले गेले आहेत. त्यातील 134 सामन्यात ऑस्ट्रेलियाने तर 106 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवला आहे. तसेच 90 सामने अणिर्नित राहिले आहेत.
आत्तापर्यंत 70 ऍशेस मालिका आयोजित करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 33 वेळा ऑस्ट्रेलियाने तर 32 वेळा इंग्लंडने मालिकेत विजय मिळवला आहे. तसेच 5 वेळा मालिका बरोबरीत सुटल्या आहेत.
1989 पासून 2002-03 पर्यंत ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेवर वर्चस्व ठेवले होते. या 13 वर्षांच्या कालावधीत ऑस्ट्रेलियाने 8 वेळा ऍशेसवर कब्जा केला आहे. पण 2001 नंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडमध्ये एकदाही ऍशेस मालिका जिंकता आलेली नाही. 2001 नंतर ऑस्ट्रेलियाने 2017-18 पर्यंत 4 वेळा ऍशेस मालिका जिंकली पण या मालिका त्यांनी मायदेशात जिंकल्या.
तर इंग्लंडने मागील 18 वर्षात 5 वेळा ऍशेस जिंकली. यामध्ये त्यांनी 2010-11 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध जिंकण्याचा कारनामाही केला. हा विजय अँड्र्यू स्ट्रॉसच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने मिळवला होता.
या ऐतिहासिक मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. त्याबद्दल सर्वकाही…
कधी होणार पहिला ऍशेस सामना?
-पहिला ऍशेस सामना 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
किती वाजता सुरु होणार पहिला ऍशेस सामना?
-पहिला ऍशेस सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे.
कुठे होणार आहे पहिला ऍशेस सामना?
-पहिला ऍशेस सामना इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथील एजबस्टर्न स्टेडियमवर होणार आहे.
कोणत्या चॅनेलवर पाहता येणार पहिला ऍशेस सामना?
-पहिला ऍशेस सामना सोनी नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.
पहिला ऍशेस सामना ऑनलाईन कसा पाहता येईल?
-पहिला ऍशेस सामना सोनीलीव (SonyLIV) या वेबसाईटवर ऑनलाईन पाहता येईल.
असे आहेत संघ –
इंग्लंड – जेसन रॉय, रोरी बर्न्स, जो रूट (कर्णधार), जो डेन्ली, बेन स्टोक्स, जोस बटलर, जॉनी बेअरस्टो, मोईन अली, ख्रिस वॉक्स, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन
(पहिल्या ऍशेस सामन्यासाठी इंग्लंडचा 11 जणांचा संघ आधीच जाहीर झाला आहे.)
ऑस्ट्रेलिया – टिम पेन (कर्णधार), कॅमरॉन बॅनक्रॉफ्ट, पॅट कमिन्स, मार्कस हॅरिस, जॉस हेजलवूड, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लबूसचने, नॅथन लायन, मिशेल मार्श, मायकेल नेसर, जेम्स पॅटिन्सन, पीटर सिडल, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर
(पहिल्या ऍशेस सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा 11 जणांचा संघ अजून जाहिर झालेला नाही.)
असे आहे ऍशेस मालिकेचे वेळापत्रक –
1-5 ऑगस्ट – पहिला सामना – एजबस्टर्न, बर्मिंगहॅम
14-18 ऑगस्ट – दुसरा सामना – लॉर्ड्स, लंडन
22-26 ऑगस्ट – तिसरा सामना – हेडिंग्ले, लीड्स
4-8 सप्टेंबर – चौथा सामना – ओल्ड ट्रॅफर्ड, मॅचेस्टर
12-16 सप्टेंबर – पाचवा सामना – ओव्हल, लंडन
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियाच्या या क्रिकेटपटूने घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
–भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत आणखी एका नावाचा समावेश; या माजी क्रिकेटपटूने केला अर्ज






