नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र संघ विजता ठरला. ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातीत महाराष्ट्र संघ अंतिम सामन्यात सौराष्ट्र संघाला मात देऊ शकला नाही. मात्र, ऋतुराजचे वैयक्तिक प्रदर्शन या मालिकेत खूपच उत्कृष्ट राहिले. संघाला अंतिम सामन्यात पोहोचवण्यासाठी त्याचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले आहे. असे असले तरी, ऋतुराज स्वतः मात्र या प्रदर्शनाने समाधानी असल्याचे दिसत नाही. त्याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये चांगले प्रदर्शन करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) विजय हजारे ट्रॉफी 2022 मध्ये वादळी खेळी करताना दिसला. त्याने उत्तर प्रदेश संघाविरुद्ध उपांत्यपूर्वी सामन्यात एका षटकात 7 षटकार मारण्याची कमाल केली. या सामन्यात त्याने 159 चेंडूत 220 धावांची नाबाद खेळी केली. उपांत्य सामन्यात ऋतुराजने 168, तर अंतिम सामन्यात देखील शतकीय योगदान दिले. सौराष्ट्रविरुद्धच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघ 248 धावा करू शकला होता, ज्यापैकी 108 धावा एकट्या ऋतुराजच्या होत्या. लिस्ट एक क्रिकेटमधील विजय हजारे ट्रॉफी त्याने गाजवली असली, तरी भारतासाठी तो एकदिवसीय प्रकारात जास्त खेळू शकला नाहीये. तसेच कसोटी फॉरमॅटमध्येही त्याला अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे.
याच पार्श्वभूमीवर भारताच्या या 25 वर्षीय युवा खेळाडूने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ऋतुराज गायकवाड म्हणाला की, “मी टी-20 क्रिकेटमध्ये धावा केल्या आहेत. मी पुढेही असेच खेळू इच्छितो आणि 50 षटकांच्या क्रिकेट प्रकारात चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात असेल. तेव्हा कुठे माझी कारकिर्द पूर्ण होऊ शकेल. असे होऊ शकले, तर मी स्वतःला पूर्णपणे तयार क्रिकेटपटू समजेल.”
दरम्यान, ऋतुराजच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने भारतासाठी काही सामन्यांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ऋतुराजने राष्ट्रीय संघासाठी आतापर्यंत 9 टी-20, एक एकदिवसीय सामना खेळला आहे. यामध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे 135 आणि 19 धावांची नोंद आहे. त्याची आयपीएल कारकिर्द मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तुलनेत खूपच उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 36 आयपीएल सामन्यांमध्ये 1207 धावा केल्या आहेत. (When he plays in all three formats, he considers himself a complete cricketer said Ruturaj Gaikwad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भल्याभल्यांना पुरून उरलाय रोहित शर्मा, बनला 500 सिक्स मारणारा पहिला भारतीय
सामना गमावला, पण श्रेयस अय्यरने करून दाखवला नाद पराक्रम; विराट अन् धोनीला पछाडत बनला अव्वल फलंदाज