बांगलादेश विरुद्ध भारत (BANvIND) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला गेला. गुरूवारी (22 डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने 3 विकेट्सने थरारक विजय मिळवला. तिसऱ्या दिवशी भारताने ज्याप्रकारे फलंदाजी केली त्यावरून तरी संघाचा विजय अवघडच वाटत होता. त्यावेळी आर अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला जिंकवले. या मालिकेत केएल राहुलकडून एमएस धोनीची एक परंपरा मोडली गेली.
झाले असे की, जेव्हा एमएस धोनी (MS Dhoni) भारताचा कर्णधार झाला तेव्हापासून त्याने मालिका विजयचा चषक नवख्या किंवा युवा खेळाडूच्या हातात पहिल्यांदा सोपवण्याची परंपरा सुरू केली. जी पुढे विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांनीही सुरू ठेवली. मात्र केएल राहुल याच्याकडून त्या परंपरेत खंड पडला. त्याने बांगलादेश विरुद्धची जिंकलेल्या कसोटी मालिकेचा चषक जयदेव उनाडकट याच्या हातात दिला.
उनाडकट, या 31 वर्षीय खेळाडूने भारताच्या कसोटी संघात 12 वर्षानंतर पुनरागमन केले. या मालिकेत दुसऱ्या सामन्यात खेळताना कारकिर्दीतील तो संघात परतला आणि 3 विकेट्सही घेतल्या. त्याने 2010मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत पदार्पण केले होते. राहुलने त्याच्या हातात विजयी चषक दिल्याने भारताच्या या प्रभारी कर्णधाराचे चाहत्यांनी कौतुक केले आहे.
KL Rahul handed the Trophy to Unadkat who made a return into the Test team after 12 long years.
Nice gesture from the captain. pic.twitter.com/aywpFf4eRA
— Johns. (@CricCrazyJohns) December 25, 2022
या मालिकेत राहुल रोहित शर्मा याच्याजागी नेतृत्व करत होता. नेतृत्वात तो सरस असला तरी फलंदाजीत बराच मागे पडल्याने चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले. आता मात्र त्याच्या या निर्णयाचे लोक कौतुक करत आहेत.
या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली होती. त्यांचा हा निर्णय चांगलाच अंगलट आल्याचे दिसले, कारण यजमान पहिल्या डावात सर्व विकेट्स गमावत 227 धावसंख्याच उभारू शकला. या डावात भारताकडून उमेश यादव आणि अश्विनने प्रत्येकी 4-4 विकेट्स घेतल्या. भारताने पहिल्या डावात रिषभ पंतच्या 93 आणि श्रेयस अय्यरच्या 87 धावांच्या जोरावर 314 धावसंख्या उभारत 87 धावांची आघाडी घेतली होती. बांगलादेशने दुसऱ्या डावात 231 धावा केल्या.
दुसऱ्या डावात भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले असताना पाहुण्या संघाच्या झटपट विकेत पडल्या. तेव्हा अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी आठव्या विकेटसाठी नाबाद 71 धावांची भागीदारी केली. त्यामध्ये अश्विन 42 धावा करत नाबाद राहिला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नॉर्मल वाटलो का! अश्विनने 2022मध्ये कसोटीत चोपल्या विराट अन् श्रेयसपेक्षा जास्त धावा, आकडा वाचाच
ग्रेट भेट! सचिनकडून लहान मुलांना ख्रिसमसनिमित्त खास गिफ्ट्स, पाहा व्हिडिओ