आयपीएलची दुसरी सर्वात मोठी आणि चार-चार आयपीएल ट्रॉफी असलेली टीम म्हणजे चेन्नई सुपर किंग्स. एमएस धोनीच्या कॅप्टन्सीत गोल्डन पिरेड पाहिलेल्या सीएसकेने २०२२ मध्ये नवी सुरुवात केली. धोनी संघात आहे पण कॅप्टन बनलाय रवींद्र जडेजा, पण ही कॅप्टन्सी जडेजाला काही रास आली नाही आणि टीम प्ले ऑफच्या रेसमधून बाहेर पडली. कॅप्टन म्हणून जडेजाचा करिअरची सुरुवात खराब झाली. कॅप्टन म्हणून आयपीएल डेब्यू विसरण्यासारखा राहिला असला तरी, खेळाडू म्हणून आपला पहिला सीझन त्याने गाजवलेला. त्याचं फार कौतुक झालेल. टीम इंडियात जागाही मिळालेली पण त्याचवेळी त्याच्यावर एक वर्षाचा बॅनही लागलेला. त्याचीच ही कहाणी.
१ जून, २००८ ला राजस्थान रॉयल्स पहिल्या आयपीएलचे चॅम्पियन बनलेले. कोणाच्या खिजगिणतीतही नसताना रॉयल्सने ही कामगिरी करून दाखवलेली. चार-दोन बडे प्लेयर सोडले तर बाकी सर्व यंग ब्रिगेड होती, तेव्हा भारत अंडर नाईन्टीनचा वर्ल्ड चॅम्पियन होता. त्या टीममधील १-२ प्लेयर प्रत्येक संघात होते. तसाच राजस्थान रॉयल्समध्ये होता रवींद्र जडेजा. राजस्थानने ट्रॉफी जिंकली त्यात जडेजाचाही खारीचा वाटा होताच. चांगली हीटिंग करण्याची क्षमता, इफेक्टीव लेफ्ट आर्म स्पिन आणि फिल्डिंगचा तर नादच नाही. असे थ्रीडी स्किल त्याच्याकडे होते. राजस्थानचा कॅप्टन असलेल्या शेन वॉर्नला जडेजा खूपच आवडलेला. त्याला त्याने पहिल्या काही दिवसातच सांगितले तू लवकर टीम इंडियासाठी खेळतोय. सोबतच जडेजाचे टोपण नावही वॉर्नने ठेवले, ‘रॉकस्टार.’
पहिल्या सिझनला कमाल केलेला हा रॉकस्टार पुढच्या वर्षाच्या सुरुवातीलाच टीम इंडियासाठी खेळला. नुकती त्याचवेळी दुसऱ्या आयपीएल सीझनसाठी कॉन्ट्रॅक्ट साईन करायला सुरुवात झाली. राजस्थानच्या मॅनेजमेंटने जडेजाला बोलावून घेतले आणि सांगितले, “चॅम्पियन आम्ही तुला दोन वर्षासाठी रिटेन करतोय.” जडेजा फक्त थँक्यू म्हणाला. त्यावेळी कॉन्ट्रॅक्ट साईन करणाऱ्यांनी विचारले, “तू खुश नाही का झाला?” त्यावर जडेजाचे उत्तर अनपेक्षित होते. तो म्हणाला, “खुश तर आहे मी फक्त थोडे पैसे वाढले असते तर बरे झाले असते.” मॅनेजमेंटने त्याला आयपीएलचे नियम सांगितले, ज्यामध्ये असे पैसे वाढवण्याची परवानगी फ्रेंचायझीला नव्हती. त्यावर जडेजाने तोडगा म्हणून म्हटले, तुम्ही माझ्याशी फक्त एकाच वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट करा. राजस्थान मॅनेजमेंटला कळून चुकले होते की, याला पैशांची लालच आहे. त्यांनी एका वर्षाचे कॉन्टॅक केले, पण पुढच्या वर्षी कॉन्ट्रॅक्ट करण्याचा पर्याय खुला ठेवला.
जडेजाने दुसऱ्या सिझनलाही कमाल केली, पण खरी धमाल त्यानंतर येणार होती. कारण, होणार होता एक ड्रामा. आयपीएल २०१० सुरू व्हायच्या एक महिनाभर आधी न्यूज आली की, रवींद्र जडेजाला आयपीएल २०१० मधून बॅन केले गेलेय. चर्चांना सुरुवात झाली आणि समोर आलं एक नाट्य.
हेही पाहा- पैशासाठी लालची जडेजावर घातलेली बीसीसीआयने बंदी
वर्षभराआधी जसं जडेजाने राजस्थान मॅनेजमेंटला वेठीस धरलं होतं तसंच यावेळीही घडलेलं. राजस्थान रॉयल्सशी कॉन्ट्रॅक्टेड असताना दुसऱ्या फ्रँचायजीशी वाटाघाटी केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आलेला. प्राथमिक चौकशी करून कोड ऑफ कण्डक्टचे उल्लंघन केले म्हणून आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने त्याला बॅन केले. जडेजाने त्याच्या विरोधात अपील केले पण काही परिणाम झाला नाही आणि हे बॅन कायम राहिले. एकतर्फी निर्णय नको म्हणून नामांकित वकील अरुण जेटली यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केले गेले. त्यामध्ये माहिती समोर आली की, रवींद्र जडेजाने जास्त रकमेच्या लालचेत २०१० आयपीएलसाठी राजस्थान सोबतचे कॉन्ट्रॅक्ट वाढवले नव्हते. त्याने परस्पर मुंबई इंडियन्सशी बोलणी केली होती आणि आपले कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट मुंबई मॅनेजमेंटशी शेअर केलेले. मुंबईने त्याला जास्त रकमेची ऑफर दिलेली. जेटली यांनी तो बॅन कायम ठेवला आणि मुंबईने पुन्हा असं काही केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशाराही दिला. जडेजा २०१० आयपीएलमधून ऑफिशियली बाहेर झाला.
पुढच्या वर्षी जडेजा मेगा ऑक्शनमध्ये आला आणि नव्याने आलेल्या कोची टस्कर्स केरलाने त्याच्यावर मोठी बोली लावत, त्याला आपल्या टीममध्ये घेतले, पण त्या एका वर्षानंतर कोची टीमच बॅन झाली आणि जडेजा पुन्हा ऑक्शनमध्ये गेला. यावेळी सीएसकेने ११ कोटींपेक्षा जास्त रकमेची बोली लावून, त्याला चेन्नईचा सुपर किंग बनवला. त्यानंतर जे घडला तो केवळ इतिहास होता. जडेजा आज आयपीएल नव्हेतर वर्ल्ड क्रिकेटमधील बेस्ट ऑल राऊंडर आहे. आता कॅप्टनही बनलाय, पण थोड्याफार पैशांच्या लालसेपोटी अगदी कमी वयातच त्याला बदनाम व्हावे लागले होते, हे देखील सत्य आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा तुटला होता ‘कॅप्टन कूल’ धोनीच्याही संयमाचा बांध, भलताच झालेला ‘अँग्री यंग मॅन’