---Advertisement---

रोहितच्या पत्नीचे विराटशी होते खास नाते, सिनेमा थिएटरबाहेर एकत्र दिसल्याने झाली होती खूप चर्चा

On: शुक्रवार, मे 21, 2021 2:52 PM
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानात अनेक असे क्रिकेटपटू आहेत, जे आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत असतात. परंतु चाहत्यांना त्यांच्या मैदानातील कामगिरीसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायलाही तितकाच रस असतो. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने २०१७ मध्ये अनुष्का शर्मासोबत विवाह केला होता. परंतु तुम्हाला माहीत आहे का, एकेकाळी विराट कोहलीचे नाव रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहसोबत जोडले गेले होते.

रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांचा विवाह होऊन अनेक वर्षे पालटली आहेत. दोघांना कन्यारत्न प्राप्ती देखील झाली आहे. परंतु एकदा रितिका सजदेहचे नाव विराट कोहलीसोबत जोडले गेले होते. दोघेही २०१३ मध्ये एकत्र चित्रपटगृहातून बाहेर येताना दिसून आले होते. परंतु त्यावेळी रितिकाला कोणीच ओळखत नव्हते. ही गोष्ट तेव्हाची आहे, जेव्हा भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावरून परतला होता. त्यावेळी विराट कोहलीला मुंबईतील एका चित्रपटगृहाबाहेर एका मुलीसोबत पाहिले गेले होते. त्यावेळी त्यांचे अनेक फोटोज् क्लिक केले गेले होते.

एशियन एज वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहलीसोबत जी मुलगी होती. ती रितिका सजदेह होती. परंतु त्यावेळी तिला कोणीच ओळखत नव्हते. फोटोज् घेतल्यानंतर विराट कोहलीला काहीच फरक जाणवला नव्हता. परंतु रितिकाने आपला चेहरा लपवला होता.

रितिकाने पार पाडली विराटच्या मॅनेजरची भूमिका
विराट कोहली आणि रितिका सजदेह यांची भेट २०१० मध्ये आयपीएल स्पर्धेदरम्यान झाली होती. तेव्हापासून विराट कोहली आणि रितिका सोबत काम करत होते. २०१३ पर्यंत विराट कोहलीचे ब्रँड प्रमोशन आणि इतर काम रितिका पाहायची. त्यावेळी विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे काहीच नाते नव्हते. तसेच रितिका आणि रोहित शर्मा यांचे देखील काहीच संबंध नव्हते. त्यानंतर २०१५ मध्ये रितिका आणि रोहित शर्मा यांचा विवाह झाला; तर २०१७ मध्ये विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा विवाह झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

“अनिल कुंबळेने अनेकदा माझी रात्रीची झोप उडवली होती,” सार्वकालिन फलंदाजाचे लक्षवेधी वक्तव्य

मॅच फिक्सिंगची एक चूक अन् कारकिर्दीवर लागला पूर्णविराम; नाहीतर आज असता जडेजाचा पर्यायी अष्टपैलू!

धोनीच्या काळात हिट ठरलेली ‘कुलचा’ जोडी का तुटली? स्वत: युजवेंद्र चहलने सांगितले कारण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---