भारतीय क्रिकेट जगतात असे काही उत्कृष्ट खेळाडू आहेत, ते जेव्हा निवृत्ती घेतील तेव्हा संपूर्ण देशाला वाईट वाटेल. कारण या खेळाडूंची लोकप्रियता फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगभर आहे. भारताच्या या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने अवघ्या क्रिकेट जगताला भूरळ पाडली आहे. त्यामुळे क्रिकेटचे चाहते भारताच्या या खेळाडूंवर खूप प्रेम करतात.
भारताचे ४ खेळाडू ज्यांच्या निवृत्तीने अवघा देश रडेल- (When these 4 players retire, the entire country will cry)
सुरेश रैना-
भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना (Suresh Raina) आपल्या फलंदाजीबरोबरच गोलंदाजीसाठीही ओळखला जातो. त्याचबरोबर तो आपल्या शानदार क्षेत्ररक्षणासाठीही ओळखला जातो.
रैना मागील काही वर्षांपासून भारतीय संघातून बाहेर आहे. त्याने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली आहे. त्याला ‘मिस्टर आयपीएल’ (Mr. IPL) या टोपणनावानेही ओळखले जाते.
रैनाने आतापर्यंत १८ कसोटी, २२६ वनडे आणि ७८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ७६८, वनडेत ५६१५ आणि टी२०त १६०४ धावा केल्या आहेत. रैना जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेईल तेव्हा नक्कीच सर्वांना खूप वाईट वाटेल.
रोहित शर्मा-
भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) संपूर्ण जगात ‘हिटमॅन’ (Hitman) या नावाने प्रसिद्ध आहे. भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार रोहित क्रिकेटच्या चाहत्यांना खूप आवडतो. त्याने आपल्या संपूर्ण वनडे कारकीर्दीत ३ वेळा द्विशतक ठोकले आहेत.
रोहितने ३२ कसोटी सामने, २२४ वनडे आणि १०८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत २१४१, वनडेत ९११५ आणि टी२०त २७७३ धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर रोहितला त्याच्या दमदार षटकारांसाठीही ओळखले जाते. त्यामुळे जेव्हा रोहित क्रिकेटमधून निवृत्ती घेईल तेव्हा अवघ्या भारताला वाईट वाटेल.
विराट कोहली-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) गणना सध्या जागतिक क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांमध्ये केली जाते. त्यामुळे त्याला क्रिकेट जगतात ‘रन मशीन’ या नावानेही ओळखले जाते. विराटने ८६ कसोटी, २४८ वनडे आणि ८१ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ७२४०, वनडेत ११८६७ आणि टी२०त २७९४ धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर विराटला जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी एक समजले जाते. त्यामुळे जेव्हा विराट क्रिकेटमधून निवृत्ती घेईल तेव्हा संपूर्ण देशाला गहिवरून येईल.
एमएस धोनी-
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी (MS Dhoni) २०१९च्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर एकदाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. धोनी क्रिकेट जगतात आजपर्यंतचा सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेटपटू आहे. क्रिकेटचे चाहते त्याच्यावर खूप प्रेम करतात. त्याचबरोबर धोनी भारतीय संघाचा यशस्वी कर्णधार आहे.
धोनीने आतापर्यंत ९० कसोटी, ३५० वनडे आणि ९८ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने कसोटीत ४८७६, वनडेत १०७७३ आणि टी२०त १६१७ धावा केल्या आहेत. त्याला ‘कॅप्टन कूल’ (Captain Cool) या नावानेही ओळखले जाते. धोनी जेव्हा क्रिकेटमधून निवृत्ती घेईल तेव्हा संपूर्ण देशातील चाहत्यांच्या डोळ्यात पाणी येईल.
ट्रेंडिंग घडामोडी-
-कारण आले समोर, रोहितला २०११ विश्वचषकात यामुळे मिळाले नव्हते स्थान
-थेट चाहत्याने डिझाईन केलेली जर्सी वापरणार ऑस्ट्रेलिया टीम
-टाॅप ३- सर्वाधिक वेळा आयसीसी चॅंपियन्स ट्राॅफी जिंकणारे संघ