---Advertisement---

लवकरच होणार या वेगवान गोलंदाजाचं भारतीय संघात पुनरागमन; अजित आगरकर यांनी केला मोठा खुलासा

On: सोमवार, जुलै 22, 2024 3:05 PM
Mohammed-Shami-Injury
---Advertisement---

श्रीलंका मालिकेसाठी रवाना होण्यापूर्वी हेड कोच गाैतम गंभीर आणि निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. मीडियाला संबोधित करताना गाैतम गंभीर आणि अजित आगरकरने पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिले. यादरम्यान मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल विचारले असता, निवडकर्ता अजित आगरकरने मोठे अपडेट दिला आहे. एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतर मोहम्मद शमी दुखापतीमुळे संघाबाहेर आहा. अलीकडेच त्याच्या पायाच्या टाचावर सर्जरी झाली आहे. सध्या मोहम्मद शमी रिकव्हरी करत आहे.

अजित आगरकरने मोहम्मद शमीच्या पुनरागमाबाबत म्हणाला, “त्याने आता गोलंदाजी सुरू केली आहे. पहिली कसोटी 19 सप्टेंबर रोजी आहे. तोपर्यंत त्याने पुनरागमन करावे, हे नेहमीच ध्येय होते. तोपर्यंत तो संघात परत येऊ शकतो, पण अद्याप त्याच्या रिकव्हरीबाबत मला एनसीएच्या लोकांशी विचारावे लागेल. मग याबाबत चित्र स्पष्ट होईल.

येत्या काळात भारतीय संघ पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबर रोजी बांग्लादेश विरुद्ध खेळला जाणार आहे. त्याचबरोबर भारताला बांग्लादेशसोबत दोन कसोटी सामने खेळायचे आहेत. यानंतर भारताला नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल, जिथे भारताला पाच कसोटी सामने खेळायचे आहेत.

मोहम्मद शमीच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर शमीने जानेवारी 2013 मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केले होते. भारतीय संघाच्या या स्टार गोलंदाजाने आतापर्यंत 101 एकदिवसीय सामने खेळला आहे. ज्यामध्ये त्याने 195 विकेट्स मिळवल्या आहेत. तर कसोटी सामन्यामध्ये शमीने आतापर्यंत 64 सामने खेळला आहे. ज्यामधील 122 डावात 229 विकेट्स घेतल्या आहेत. तर शमीने 23 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यामध्ये 24 विकेट घेतल्या आहेत. जर या घातक गोलंदाजाने टीम इंडियामध्ये पुनरागमन केल्यास भारतीय संघाची गोलंदाजी युनीट आणखी बळकट होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडच्या विजयामुळे भारतीय संघाचं नुकसान? वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा बदल
सचिन तेंडुलकरचा शतकांचा रेकॉर्ड धोक्यात? इंग्लंडच्या माजी कर्णधाराचा जो रुटबाबत मोठा दावा
IND vs SL: टीम इंडिया श्रीलंका दाैऱ्यावर रवाना, पाहा नव्या कर्णधाराचा हटके स्वॅग, तर हार्दिकने…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---