---Advertisement---

विराट कोहली परतल्यानंतर ‘या’ क्रमांकावर करणार फलंदाजी, माजी दिग्गजाने स्पष्ट केले कारण

On: मंगळवार, ऑगस्ट 2, 2022 3:28 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली खराब फॉर्मशी झगडत आहे. विराट सध्या क्रिकेटमधून ब्रेकवर असून वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी तो टीम इंडियाचा भाग बनला नाही. इंग्लंड दौऱ्यानंतर कर्णधार रोहित शर्मालाही एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती, मात्र तो पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघात परतला होता. विराटच्या पुनरागमनानंतर तो टीम इंडियामध्ये कोणत्या फलंदाजी क्रमाने खेळणार याबाबत माजी क्रिकेटपटू वसीम जाफरने आपले मत मांडले आहे.

एका वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, वसीम जाफर म्हणाला की, “विराट कोहली त्याच्या नंबर-३ स्थानावर कायम राहील तर केएल राहुल आणि रोहित शर्माने डावाची सुरुवात करावी. यानंतर रिषभ पंत, संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्या योगदानाचा विचार करता येईल. मला वाटते की टीम इंडियाने स्वीकारलेली आक्रमक पध्दत खूप चांगली आहे. त्यामुळे टीम इंडियाची टी-२० वर्ल्ड कप जिंकण्याची शक्यता वाढली आहे.”

तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंबाबत जाफर म्हणाला की, “तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळत राहणे खूप कठीण आहे. तुम्हाला स्वतःला सुधारावे लागेल आणि फॉर्मेटनुसार स्वतःला जुळवून घ्यावे लागेल. विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते, तेव्हापासून त्याचा फॉर्म सातत्याने घसरत आहे.”

दरम्यान, झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी विराट भारतीय संघाचा भाग नाही, त्यामुळे तो आता आशिया चषकासह संघात पुनरागमन करेल, असे मानले जात आहे. विराट कोहलीने यंदाच्या टी-२० विश्वचषकात खेळावे की नाही, यावरही सातत्याने चर्चा होत आहे.अनेक क्रिकेट जाणकार यांनी विराट कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यासाठी झिम्बाब्वे विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, विराटने स्वत:च या दोऱ्यात विश्रांती घेण्याचा निर्णय घेतल्याचे बीसीसीआय सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

पाकिस्तानविरुद्धचं वादळी अर्धशतक फळाला, स्म्रीतीने मिळवले टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट रँकिंग

भारतीय क्रिकेटरचे इंस्टाग्राम हॅक, बायकोबरोबरचे पर्सनल चॅट व्हायरल!

‘हा तर सुर्यकुमार यादवला संपवण्याचा डाव?’, भारताच्या माजी दिग्गजाचे कर्णधार रोहितवर प्रश्नचिन्ह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---