भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. पण अध्यक्ष झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांनी एक्स वर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जय शहा (Jay Shah) यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पाकिस्तान संघात खळबळ उडाली आहे.
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champion’s Trophy 2025) पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार आहे. कदाचित भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानला जाणार नाही. याबाबत अनेक प्रकारच्या बातम्या येत होत्या. पण पाकिस्तान आयसीसीच्या माध्यमातून भारतावर दबाव आणेल, असा दावा देखील केला जात होता. पण आता सारा खेळच बदलला आहे. कारण बीसीसीआय सचिव जय शहा आयसीसी अध्यक्ष झाल्यानंतर ही परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे.
सोशल मीडिया एक्सवर अनेक युजरकर्त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफीशी संबंधित पोस्ट शेअर केल्या आहेत. रिया खत्री नावाच्या युजरनं लिहिलं की, “चॅम्पियन्स ट्रॉफी आता पाकिस्तानच्या बाहेर जाऊ शकते. अभिनंदन जय शहा.” अशा आणखी पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
– Pakistan is hosting Champions Trophy
– ICC may force India to visit Pakistan
– India didn’t want to visit Pakistan
– Jay Shah appointed as ICC chairman
– Champions trophy may go out of Pakistan. 🤡
Congrats mr.shah🫡#JayShah #ICCChairman #ChampionsTrophy #ViratKohli #Pakistan pic.twitter.com/PcL4PDJOdr— Ria Khatri (@ria68_khatri) August 28, 2024
आगामी चॅम्पियन्स ट्राॅफी खेळण्यासाठी भारतीय संघानं पाकिस्तानमध्ये जाऊ नये. अशा अनेक प्रतिक्रिया भारतीय दिग्गजांनी दिल्या आहेत. पण आता जय शाह आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. म्हटल्यावर भारत चॅम्पियन्स ट्राॅफी खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये जाणार की नाही? हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरेल. पण जय शाह चॅम्पियन्स ट्राॅफी पाकिस्तानमध्ये होऊ देतील की नाही? यावर सुद्धा चाहत्यांची नजर असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! इंग्लंडच्या दिग्गज फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती
राजस्थान फ्रँचायझीला मोठा फटका, स्पर्धेपूर्वीच दिग्गज खेळाडू बाहेर
झहीर खान लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील होणार? मोठी अपडेट समोर