पाकिस्तान संघाचा माजी गोलंदाज आणि ‘रावळपिंडी एक्सप्रेस’ नावाने ओळखला जाणारा शोएब अख्तर आपल्या वेगवान गोलंदाजीची प्रसिद्ध आहे. त्याच्या गोलंदाजीची गती पाहून फलंदाजांचा थरकाप उडायचा. त्याने १८ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू (१६१.३ किमी/ताशी) टाकण्याचा पराक्रम केला होता.
ज्यावेळी त्याने हा चेंडू टाकला होता, त्यावेळी इंग्लंड संघाचा सलामीवीर फलंदाज निक नाईट फलंदाजी करत होता. हा एक असा पराक्रम आहे, जो १८ वर्षे उलटून गेली असली तरीही कुठल्याच गोलंदाजाला तोडता आला नाही. अशातच शोएब अख्तरला प्रश्न विचारण्यात आला होता की, असा कोण गोलंदाज आहे जो हा विक्रम तोडू शकेल? यावर त्याने काय उत्तर दिले चला पाहूया.
शोएब अख्तरने ‘स्पोर्ट्सकीडा’सोबत चर्चा करताना म्हटले की, “मला वाटत नाही की, माझा हा विक्रम कोणी तोडू शकेल. माझा हा विक्रम पुढील वर्षानुवर्षे अबाधित राहिल.”
शोएब अख्तरने आपल्या कारकिर्दीत धारदार आणि वेगवान गोलंदाजीने अनेक दिग्गज फलंदाजांना माघारी धाडले होते. शोएब अख्तर नंतर आणखी एक गोलंदाज आहे, ज्याने आपल्या गतीने सर्वांनाच आश्चर्यचकित करून सोडले होते. ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज शॉन टेट याने देखील इंग्लंड संघाविरुद्ध खेळतांना १६१.१ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी केली होती. दुखापतीमुळे तो आपली कारकीर्द सुरु ठेऊ शकला नाही, त्याने दुखापतीमुळे वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला होता.(who can break the record of fastest ball in international cricket shoaib akhtar respond)
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियन संघाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याचे नाव आहे. १६ वर्षांपूर्वी नेपियरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या सामन्यात क्रिकेट इतिहासातील तिसरा सर्वात वेगवान चेंडू फेकला गेला होता. ब्रेट लीने १६०.८ किमी दर ताशीच्या गतीने गोलंदाजी केली होती.
तसेच शोएब अख्तरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने पाकिस्तान संघासाठी एकूण ४६ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याला १७८ गडी बाद करण्यात यश आले होते. तसेच १६३ वनडे सामन्यात त्याने २४७ गडी बाद केले होते. तर १५ टी-२० सामन्यात त्याला १९ गडी बाद करण्यात यश आले होते.
महत्वाच्या बातम्या-
फलंदाजी प्रशिक्षकाला कोरोना झाल्याने श्रीलंकेच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल, आता ‘हा’ दिग्गज देणार धडे
श्रीलंका बोर्डाने घोषित केली भारत-श्रीलंका सामन्यांची वेळ, पाहा किती सुरू होणार मॅच?