भारतीय १९ वर्षाखालील संघाने आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत (icc under 19 world cup) आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. या संघाने साखळी फेरीतील एकही सामना गमावला नव्हता. तसेच शनिवारी (२९ जानेवारी) बांगलादेश विरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बांगलादेश (India vs Bangladesh) संघाला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक दिली आहे. यासह २०२० मध्ये झालेल्या पराभवाचा बदला देखील घेतला आहे. या सामन्यात बांगलादेश संघाचा डाव अवघ्या १११ धावांवर संपुष्टात आला होता. यामध्ये भारतीय संघाकडून ३ गडी बाद करणाऱ्या रवी कुमारने (Ravi Kumar) मोलाची भूमिका बजावली होती. याच कामगिरीच्या जोरावर त्याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.
भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवून देण्यात रवी कुमारने मोलाची भूमिका बजावली. त्याने ७ षटकात १४ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. महफिझुल इस्लाम आणि इफ्तिखार हुसेन या सलामीच्या जोडीशिवाय रवीने पीएन नबीललाही बाद करत माघारी धाडले. कोलकाता येथे राहणारा रवी कुमार हा माजी भारतीय खेळाडू देवांग गांधी यांचा शिष्य आहे. देवांग गांधी यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे रवी कुमार या स्तरावर खेळू शकतोय.
व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
अंडर-१६ ट्रायल मधून झाला होता बाहेर
रवी कुमारचे वडील केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ)मध्ये कार्यरत आहेत. त्याचा जन्म कोलकाता येथे झाला होता. परंतु त्यानंतर त्याचे कुटुंब अलिगढ येथे स्थायिक झाले होते. इथेच त्याच्या क्रिकेटच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्याने अरविंद भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. त्यानंतर तो पुढील सराव करण्यासाठी कोलकाता येथे आला होता. रवी २०१९ मध्ये बालिगुंज युनायटेडमध्ये १६ वर्षाखालील वयोगटाचे ट्रायल देण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याची निवड झाली नव्हती. कारण तो टीडब्ल्यू ३ (वयाची चाचणी) चाचणीत फेल झाला होता.
त्यानंतर त्याने कंचनगंग वॉरियर्स संघाकडून टी२० लीग स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर त्याने बंगालच्या १९ वर्षीय संघात स्थान मिळवले. १९ वर्षाखालील विनू माकडं ट्रॉफी स्पर्धेत, निवडकर्ते आणखी एक गोलंदाज डेबो प्रतिमला पाहण्यासाठी गेले होते. जो चांगली कामगिरी करत होता. मात्र, रवीने राष्ट्रीय निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले होते.
महत्वाच्या बातम्या:
नेदरलॅंडच्या सर्वात यशस्वी फलंदाजाचा २९ व्या वर्षी क्रिकेटला रामराम; ट्विटरवरून केली घोषणा
हे नक्की पाहा: