---Advertisement---

मुंबई इंडियन्सचा नवा फिनिशर नेहल वढेरा! एकाच डावात ठोकलेले तब्बल 37 षटकार

On: सोमवार, एप्रिल 3, 2023 7:21 PM
---Advertisement---

रविवारी (दि. 2 एप्रिल) इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळला गेला. सालाबादप्रमाणे मुंबई संघाने आपल्या पहिल्या सामन्यावर पाणी सोडले. हा सामना बेंगलोरने 8 विकेट्स शिल्लक ठेवून खिशात घातला. तसेच, स्पर्धेत विजयी सुरुवात केली. मुंबईचा पराभव झाला असला तरी, आपले आयपीएल पदार्पण करणाऱ्या नेहल वढेरा याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र, हा युवा खेळाडू नक्की आहे तरी कोण?

मुंबईचे चार गडी बाद झाल्यानंतर सहाव्या क्रमांकावर नेहल फलंदाजीला आला. पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार वसूल केला. त्याने तिलक वर्मासह भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. कर्ण शर्माला त्याने सलग दोन उत्तुंग षटकार ठोकले. यातील एक षटकार तब्बल 101 मीटरचा होता. त्याने 13 चेंडूत 22 धावा केल्या. त्यानंतर त्याच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली.

नेहल याने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पंजाबसाठी मागील वर्षी पदार्पण केले होते. 22 वर्षीय नेहलने 5 सामन्यात 376 धावा केलेल्या. विशेष म्हणजे त्यामध्ये त्याने एक 214 धावांची खेळी केलेली. आरसीबीविरूद्ध खेळलेला सामना त्याच्या एकूण टी20 कारकिर्दीतील पहिला सामना होता. यापूर्वी त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकही प्रथमश्रेणी अथवा टी20 सामना खेळलेला नाही.

मागील वर्षी पंजाब क्रिकेट संघटनेच्या 23 वर्षांखालील आंतरजिल्हा स्पर्धेत त्याने भटिंडाविरुद्ध एकाच डावात 578 धावा चोपल्या होत्या. लुधियानाकडून खेळताना नेहलने 42 चौकार आणि 37 षटकारांची आतिषबाजी केलेली. त्याचवेळी मुंबई इंडियन्सच्या स्काऊटची त्याच्यावर नजर पडली. त्यानंतर आयपीएल 2023 लिलावात त्याच्यावर 20 लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात मुंबईने सामील करून घेतले. आपल्या पहिल्या सामन्यात त्याने प्रभाव पाडत संघ व्यवस्थापनाला खूश केले.

(Who Is Mumbai Indians Nehal Wadhera Who Hits 101 Meters Six Against RCB)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! नो-बॉल दिल्यामुळे 22 वर्षीय अंपायरची चाकू खुपसून हत्या, सर्वत्र माजलीये खळबळ
अशी ताकद लावायची! दिग्गज विराटकडून युवा फलंदाज तिलक अन् नेहालला खास टिप्स, फोटो जोरदार व्हायरल

 

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---