लवकरच भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही बलाढ्य संघ ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आमनेसामने येणार आहेत. २६ डिसेंबरपासून या मालिकेतील पहिल्या कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. बुधवारी (८ डिसेंबर) या मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात काही मोठे बदल करण्यात आले आहे. अजिंक्य रहाणेला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले आहे. तर संघातील काही दिग्गज खेळाडूंना दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे. तर राखीव खेळाडूंमध्ये स्थान देण्यात आलेले एक नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे.
बीसीसीआयने दीर्घकाळ चर्चा केल्यानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी १८ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघात असेही काही खेळाडू होते ज्यांना संघात स्थान मिळण्याची शक्यता खूप कमी होती. ज्यामध्ये ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा समावेश होता. परंतु, बीसीसीआयने या खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांना या मालिकेसाठी संघात स्थान दिले आहे. तर राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आलेला सौरभ कुमार सध्या प्रचंड चर्चेत आहे.
कोण आहे सौरभ कुमार ?
सौरभ कुमारचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाला होता. याच वर्षी मार्च महिन्यात इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या २ कसोटी सामन्यात त्याची नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली होती. तसेच त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील अप्रतिम कामगिरी केली आहे. तो सध्या भारत अ संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. हा दौऱ्यावर चांगली कामगिरी करत त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
भारतीय संघातील मुख्य गोलंदाज अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे राखीव खेळाडू म्हणून फिरकीपटू सौरभ कुमारची निवड करण्यात आली आहे. तो फक्त फिरकी गोलंदाजीच नव्हे तर गरज पडल्यास फलंदाजी देखील करतो. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत त्याने ८ अर्धशतक आणि २ शतके झळकावली आहेत.
सर्व्हिसेस संघाचे केले आहे प्रतिनिधित्व
सौरभ कुमार सध्या उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करतोय. यापूर्वी त्याने सर्व्हिसेस संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तो हवाई दलात होता. त्यानंतर २०१५ मध्ये त्याने उत्तर प्रदेश संघाकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्याच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरला. त्याने पहिल्याच हंगामात १७ गडी बाद करत ३०४ धावा केल्या. त्याने याच हंगामातील एका सामन्यात १० गडी बाद करण्याचा कारनामा केला होता.
धोनीसोबत आहे खास कनेक्शन
सौरभ कुमारला २०१७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रायसिंग पुणे सुपरजायंट्स संघाने १० लाख रुपयांत खरेदी केले होते. परंतु त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. तर आयपीएल २०२१ स्पर्धेत त्याला पंजाब किंग्स संघाने मूळ किमतीत खरेदी केले होते.
महत्वाच्या बातम्या :
विराट कोहलीने शेअर केला ‘८०च्या दशकातील मुलां’चा फोटो; लिहिले, ‘एकेकाळची गोष्ट आहे…’
हार्दिकने दिले अकाली निवृत्तीचे संकेत; ‘या’ कारणाने घेऊ शकतो निर्णय
अरे काय चाललंय! बलाढ्य इंग्लंड संघाचे ऍशेसमध्ये लज्जास्पद प्रदर्शन, ६ फलंदाज एकेरी धावेवर बाद