भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखून विजय मिळवला होता. तर मालिकेतील दुसरा वनडे सामना बुधवारी (९ फेब्रुवारी ) पार पडणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ वनडे मालिका आपल्या नावावर करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान, या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) सोबत डावाची सुरुवात कोण करणार हा प्रश्न आहे. पण, याबद्दल सूर्यकुमार यादवने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
दुसरा वनडे सामना सुरू होण्यापूर्वी केएल राहुलचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. तर मयांक अगरवाल देखील निवडीसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा सोबत डावाची सुरुवात कोण करणार हा प्रश्न संघ व्यवस्थापकांना नक्कीच पडला असेल. पहिल्या वनडे सामन्यात के एल राहुल उपलब्ध नव्हता. त्यामुळे ईशान किशन डावाची सुरुवात करण्यासाठी आला होता.
ईशान किशनने रोहित शर्मा सोबत डावाची सुरुवात करत भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या गाडीसाठी दोघांमध्ये ८४ धावांची भागीदारी झाली होती. यादरम्यान ईशान किशनने २८ धावांची खेळी केली होती.
दुसऱ्या वनडे सामन्याच्या पूर्वसंध्येला सूर्यकुमार यादवने एका वर्चुअल पत्रकार परिषदेत सहभाग घेतला होता. ज्यामध्ये त्याला टीम कॉम्बिनेशन बद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावेळी त्याने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर रोहित शर्मा सोबत डावाची सुरुवात कोण करणार असा प्रश्न विचारला असता, तो म्हणाला की, “तुम्ही चुकीच्या व्यक्तीला प्रश्न विचारतात, याचा निर्णय संघ व्यवस्थापक घेईल, कोणाला खेळवायचं आहे आणि कोणाला खेळवायचं नाहीये.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी कुठल्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. संघ व्यवस्थापक मला ज्या क्रमांकावर पाठवतील, त्या क्रमांकावर जाईल मी. मी तिसऱ्या ,चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे.”
महत्वाच्या बातम्या:
जेसन रॉयवर मेगा लिलावात बरसणार पैसा; पीएसएलमध्ये आणले वादळ
टूर वॉश! इंग्लंड महिला संघाचाही ऑस्ट्रेलियात सुपडा साफ; १९ सामन्यांनंतरही विजयाची पाटी कोरी
रणजी ट्रॉफी २०२२ साठी बीसीसीआयची कडक नियमावली; घेतले गेले महत्त्वाचे निर्णय