बीसीसीआयचे मुख्य निवडकर्त्ये चेतन शर्मा चांगलेच अडचणीत आले आहेत. एका वृत्तसंस्थेने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये शर्मा काही महत्वाच्या मुद्यांवर बोलले आहेत. जगभरात या स्टिंग ऑपरेशनची चर्चा सध्या सुरू आहे. विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील वादावर देखील शर्मांनी खुलासा केला. स्टिंग ऑपरेशनंतर बीसीसीआय चेतन शर्मांवर कारवाई कारवाई करू शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी संघ निवडण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पण या स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.
काही दिवसांपूर्वीच चेतन शर्मा (Chetan Sharma) बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ते म्हणून दुसऱ्यांदा निवड केली गेली. पण अशातच मंगळवारी (14 फेब्रुवारी) शर्मांविषयीचे हे स्टिंग ऑपरेशन समोर आले. यानंतर मुख्य निवडकर्त्यांच्या अडचणी चांगल्याच वाढल्या. पण बीसीसीआय त्यांच्यावर काही कारवाई करण्याआधी शर्मांना स्वतःची बाजू मांडण्याची संधी देईल, असेही सांगितले जात आहे. अशात प्रश्न असा उपस्थित होत आहे की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाटीचा संघ निवडण्याची जबाबदारी कोणाला मिळणार? मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी शर्मांच्या उपस्थितीत बैठक पार पाडून संघ निवडला होता. पण शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघ निवडण्याची जबाबादीर बीसीसी शर्मांना सोपवणार की नाही? ये लवकरच स्पष्ट होऊ शकेल. माध्यमांतील वृत्तांनुसार शर्मा या स्टिंग ऑपरेशनला बळी पडल्यानंतर बीसीसीआयचे काही वरिष्ट अधिकारी आणि संघ व्यवस्थापन त्यांच्यावर नाराज आहे.
यापुढे कोणत्याही माध्यमांच्या कर्मचाऱ्याशी बोलताना बीसीसीआय अधिकारी आणि खेळाडू यांचा त्यांच्यावर विश्वास नसेल, असे एका बीसीसीआय सूत्राने सांगितले. बीसीसीआय सूत्राच्या हवाल्याने माध्यमांमध्ये सांगितले जात आहे की, “या स्टिंग ऑपरेशनंतर कोणताही खेळाडू किंवा निवडकर्ता पत्राकांसोबत चांगले संबंध तयार करू इच्छित नसले. चेतन शर्मा जास्तच बोलून गेले. तसे पाहता भारताचा कोणताच वरिष्ठ खेळाडू वैयक्तिक त्यांच्यासोबत चर्चा करत नाहीत.”
खेळाडूंविषयी शर्मांनी केला मोठा खुलासा –
चेतन शर्मा या स्टिंग ऑपरेशनमध्ये असेही म्हणाले की, 80 ते 85 टक्के फिट असूनदेखील खेळाडू संघातील जागा कायम ठेवण्यासाठी इंजेक्शन घेतात. भारतीय संघाने मागच्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळली होती. संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत खेळला होता. पण शर्मांच्या मते बुमराह तेव्हा खेळण्यासाठी फिट नव्हता. संघ व्यवस्थापनासोबत शर्मांनी बुमहारला खेळवण्याच्या मुंद्यावरून वाद देखील घातला होता. (Who will pick the squad for the third and fourth Tests against Australia? BCCI will take a big decision)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2023 स्पर्धेत टायफुन्स, जेट्स, ऑल स्टार्स संघांचा दुसरा विजय
टीम इंडियाने कायमच राखलेय दिल्लीचे तख्त! आकडेवारी वाढवतेय ऑस्ट्रेलियाचे टेन्शन