Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नवव्या पुना क्लब प्रीमियर क्रिकेट लीग 2023 स्पर्धेत टायफुन्स, जेट्स, ऑल स्टार्स संघांचा दुसरा विजय

February 15, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या

पुणे, 15 फेब्रुवारी 2023 – पुना क्लब लिमिटेडच्या वतीने नवव्या पुना क्लब प्रीमियर लीग क्रिकेट 2023 स्पर्धेत साखळी फेरीत टायफुन्स, जेट्स, ऑल स्टार्स या संघानी सलग दुसरा विजय नोंदवला.

पुना क्लब क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत नील संगवीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर जेट्स संघाने वॉरियर्स संघाचा 5 गडी राखून पराभव करत स्पर्धेत दुसरा विजय नोंदवला. पहिल्यांदा खेळताना नील संगवी, शरण सिंग व राहूल गुप्ता यांच्या अचूक गोलंदाजीने वॉरियर्स संघाचा डाव 6 षटकात 7 बाद 33 धावांत रोखला. 33 धावांचे लक्ष पुनित सामंतच्या नाबाद 15 धावांसह जेट्स संघाने 6 षटकात 3 बाद 37 धावांसह पुर्ण केले. नील संगवी सामनावीर ठरला. गौरव रााणाच्या नाबाद 37 धावांच्या खेळीच्या जोरावर टायफुन्स संघाने व्हीएस टायगर्स संघाचा 7गडी राखून पराभव केला.

अन्य लढतीत क्रिश शहाच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या बळावर टायफून्स संघाने किंग्ज संघाचा 7 गडी राखून पराभव केला तर विक्रम काकडेच्या फटकेबाज फलंदाजीसह व्हीएस टायगर्स संघाने जॅग्वार्स संघाचा सर्व 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. खालिद परवानीच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर ऑल स्टार्स संघाने सेलर्स संघाचा सर्व 8 गडी राखून पराभव करत स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
व्हीएस टायगर्स: 6षटकात 4बाद 54धावा(तारिक परवाणी 29(17), विक्रम काकडे 18, नील हळबे 1-7, पवन कटारिया 1-11) पराभुत वि. टायफुन्स: 5.4षटकात 1बाद 59धावा (गौरव राणा नाबाद 37(19,1×4,3×6), क्रिश शहा नाबाद 17, सुशांत खोसला 1-7); सामनावीर – गौरव राणा; टायफुन्स संघ 7गडी राखून विजयी;

किंग्ज: 6 षटकात 3 बाद 71 धावा(रोहित जाधव नाबाद 34(13, 2×4,2×6), अधिश शहा 15(8, 1×6), क्रिश शहा 1-6, निल हलबे 1-13) पराभूत वि टायफून्स: 5.1 षटकात 1 बाद 73 धावा (क्रिश शहा नाबाद 37(16, 4×4,2×6), गौरव नाबाद 17(9, 1×4,1×6), अश्विन शहा 13(6, 1×4, 1×6), उमेश पिल्ले 1-17) सामनावीर- क्रिश शहा ; टायफून्स संघ 7 गडी राखून विजयी.

वॉरियर्स: 6 षटकात 7 बाद 33 धावा(आर्यमान पिल्ले 8, नील संगवी 2-3, शरण सिंग 2-4, राहूल गुप्ता 2-6) पराभूत वि जेट्स: 6 षटकात 3 बाद 37 धावा (पुनित सामंत नाबाद 15(16, 1×4), अकिलक पुनावाला 1-6, आर्यन मेहता 1-7) सामनावीर- नील संगवी ; जेट्स संघ 5 गडी राखून विजयी.

जॅग्वार्स: 6 षटकात 5 बाद 47 धावा(विनित परमार 17(12, 1×4,1×6), मनप्रित 13(10), अक्षय शहा 2-4, सुशांत खोसला 1-6, अनुज मुथा 1-6) पराभूत वि व्हीएस टायगर्स: 5 षटकात बिनबाद 51 धावा(तारिक परवानी नाबाद 26(18, 3×4), विक्रम काकडे नाबाद 21(14, 2×4, 1×6)
सामनावीर- विक्रम काकडे ; व्हीएस टायगर्स संघ 8 गडी राखून विजयी.

सेलर्स: 6 षटकात 5 बाद 50 धावा(सुमिरन मेहता नाबाद 29(19, 3×4), खालिद परवानी 1-3, गुरपावीत सिंग पथेजा 1-8) पराभूत वि ऑल स्टार्स: 5.2 षटकात 1 बिनबाद 51 धावा(प्रकाश कारिया नाबाद 24(19, 2×4), खालिद परवानी नाबाद 20(14, 1×4) सामनावीर- खालिद परवानी ; ऑल स्टार्स संघ 8 गडी राखून विजयी.

(Poona Club Premier League 2023 Typhoons All Star Won)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ना भुवी ना चहल! टी20 मध्ये बळींचे शतक बनवणारी पहिली भारतीय बनली दिप्ती  
अय्यरचे दिल्लीमध्ये होणार टीम इंडियात कमबॅक? ‘या’ खेळाडूचा पत्ता कट 


Next Post
West Indies

नेतृत्व बदलले! आता टी20 आणि वनडेसाठी वेगवेगळे कर्णधार, लगेच वाचा

Australia-Team

भारतीय चाहत्यांच्या आनंदावर विरजण! काही तासातच नंबर वनवरून खिसकली टीम इंडिया, ऑस्ट्रेलिया टॉपला

Photo Courtesy: Screengrab/You Tube/TheDangerousCricketHindi

क्रिकेटजगताला सुन्न करणारी 'ती' घटना, जेव्हा फलंदाजी करताना अचानक झाला होता क्रिकेटरचा मृत्यू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143