भारतीय संघ रविवारी आशिया चषक २०२२ हंगामातील पहिल्या सामन्यात पाकिस्तानसोबत खेळला. पहिल्याच सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आणि स्पर्धेची सुरुवात गोड केली. संघाने या सामन्यात चांगली कामगिरी केली असली, तरी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत प्लेइंग इलेव्हनमध्ये नसल्यामुळे चाहत्यांना वेगवेगळे प्रश्न पडले आहेत. रविंद्र जडेजा याने पंतला प्लेइंग इलेव्हनमधून का वगळले? या प्रश्नावर एक मजेशीर उत्तर दिले.
पाकिस्तानविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात रिषभ पंत यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडेल, अशी सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु सामना सुरू झाल्यानंतर चित्र तसे नव्हते. अनुभवी दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) या सामन्यात यष्टीरक्षाची भूमिका पार पाडताना दिसला. भारताला आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात हॉन्गकॉन्ग संघाविरुद्ध खेळायचे आहे. दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येला रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) माध्यमांशी बोलत होता. यावेळी जडेजाला रिषभ पंत (Rishabh Pant) विषयी प्रश्न विचारला गेला.
पंतला संघातून वगळण्याविषयी जडेजाला जेव्हा प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याने जे उत्तर दिले, त्यामुळे चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले आहे. त्याचे उत्तर ऐकून उपस्थित सर्वजण हसू लागले. एका पत्रकाराने त्याला विचारले की, “पाकिस्तानविरुद्ध रिषभ पंतला का खेळवले गेले नाही?” यावर जडेजाने त्याच्या अंदाजात उत्तर दिले की, “मला याविषयी अजिबातच माहिती नाहीये. हा प्रश्न माझ्या पुस्तकाच्या बाहेरचा आहे.” हे उत्तर दिल्यानंतर जडेजा स्वतः देखील हसू लागला. माध्यमांचे प्रतिनिधी देखील हसताना दिसले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1564677707539038210?s=20&t=TraNpPiEbI0F2XG-_zAvrQ
दरम्यान, मागच्या काही दिवसांमध्ये पंत चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवुड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने पंतचे नाव न घेता एक विधान केले होते, ज्यामुळे दोघांमधील मतभेत जगासमोर आले. पंत आणि उर्वशी यांच्यातील हा वाद अद्यापही शांत झाल्याचे दिसत नाहीये. रविवारी पाकिस्तानविरुद्धचा सामना पाहण्यासाठी उर्वशी देखील मैदानात उपस्थित होती. आता याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
धक्कादायक! भारतीय चाहत्याला जीवे मारण्याची धमकी; भारत-पाक सामन्यात केलेली ही कृती
‘बाप्पां’च्या भक्तीत तल्लीन झाला डेविड वॉर्नर, खास पोस्टसह जिंकली कोट्यवधी भारतीयांची मने
बुमराह लवकरच फिट होणार! ‘या’ मालिकेसाठी उपस्थित राहण्याची शक्यता