---Advertisement---

2024च्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्याला केलं मुद्दाम ट्रोल, मोठं कारण उघडकीस

---Advertisement---

शेवटच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सचा (Mumabi Indian’s) कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) खूप ट्रोल करण्यात आलं होतं. एमआयच्या चाहत्यांनीच त्याला सर्वाधिक ट्रोल केलं होतं. कारण एमआयनं त्याला 5 वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या रोहितच्या जागी कर्णधारपद दिलं होतं. पण आयपीएल 2025 पूर्वी एमआयच्या संघात अनेक मोठे बदल होऊ शकतात. यामध्ये सर्वात मोठा बदल कर्णधारपदाच्या बाबतीत होऊ शकतो.

रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. याप्रकरणी आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. गेल्या हंगामात पांड्याविरुद्ध षडयंत्र रचलं होतं. पांड्या निगेटिव्ह पीआरवरून ट्रोल झाला होता.

वास्तविक, स्पोर्ट्सयारीच्या एका व्हिडिओमध्ये हार्दिक आणि मुंबई इंडियन्सबद्दल दावा करण्यात आला आहे. त्यानुसार रोहितसह अनेक खेळाडूंना वाटत होतं की हार्दिक संघाचा कर्णधार नाही बनला पाहिजे. यासोबतच आणखी एक दावा करण्यात आला आहे की, आयपीएल 2024 मध्ये पांड्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. ते एक षडयंत्र होतं, हा एक भाग म्हणून नियोजन करण्यात आलं होतं.

तत्पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indian’s) सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) खूप प्रभाव आहे. रिपोर्ट्सनुसार तेंडुलकर आणि रोहित दोघांनाही पुढच्या हंगामात पांड्याकडे कर्णधारपद द्यायचे नाही. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

पाकिस्तानला हरवल्यानंतर बांगलादेशच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
हार्दिकच्या ‘त्या’ वागण्यामुळे नताशाला अस्वस्थ वाटू लागले होते; दोघांमधील घटस्फोटामागचे कारण आले समोर!
बांगलादेशनं दिला पाकिस्तानला झटका, WTCच्या गुणतालिकेत घेतली झेप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---