आयपीएलच्या या हंगामात महेंद्रसिंह धोनी फार कमी वेळेसाठी फलंदाजीला मैदानात येतोय. पंजाब किंग्ज विरुद्ध तर त्यानं हद्दच पार केली. माही या सामन्यात चक्क 9व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. परंतु धोनी असं का करत आहे, यामागचं कारण आता समोर आलं आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’नं दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये धोनीच्या पायाचे स्नायू फाटले होते. मात्र संघाचा दुसरा यष्टिरक्षक फलंदाज डेव्हॉन कॉनवे दुखापतग्रस्त असल्यामुळे धोनीला स्वत:ला विश्रांतीची संधी मिळाली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला खूप वेदना होत असून त्याला औषधं घ्यावी लागत आहेत. तो कमी धावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र विकेटकीपिंग करण्यासाठी त्याला मैदानात उतरावं लागतंय.
धोनीच्या सतत खेळण्यामुळे त्याची दुखापत आणखीनच वाढत असल्याचंही सांगितलं जात आहे. डॉक्टरांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र संघात दुसरा यष्टीरक्षक नसल्यामुळे हे शक्य होत नाही. उल्लेखनीय म्हणजे, महेंद्रसिंह धोनीनं आयपीएलचा शेवटचा हंगाम देखील गुडघ्याची दुखापत असताना खेळला होता. त्यानंतर सीएसकेनं आयपीएल जिंकल्यानंतर लगेचच त्याचं ऑपरेशन करण्यात आलं होतं.
एमएस धोनीनं आयपीएल 2024 मध्ये 11 सामने खेळले आहेत. या 11 सामन्यांमध्ये धोनीनं 224.49 च्या स्ट्राईक रेटनं 110 धावा केल्या आहेत, ज्यात 10 चौकार आणि 9 षटकारांचा समावेश आहे.
महेंद्रसिंह धोनीनं रविवार, 5 मे रोजी इंडियन प्रीमियर लीगमध्ये 150 झेल पूर्ण केले. स्पर्धेच्या इतिहासात असं करणारा तो पहिला यष्टिरक्षक आहे. धर्मशाला येथील हिमालच प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यादरम्यान जितेश शर्माचा झेल घेत धोनीनं हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे केला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेणार यष्टिरक्षक –
महेंद्रसिंह धोनी – 150 झेल
दिनेश कार्तिक – 141 झेल
वृद्धिमान साहा – 119 झेल
महत्त्वाच्या बातम्या –
सूर्यकुमार यादवचं शतक, प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या मुंबईनं केला हैदराबादचा खेळ खराब
वानखेडे स्टेडियमवर पहिल्यांदाच मॅच पाहायला आला ‘ज्युनियर बुमराह’, सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल
कोण आहे अंशुल कंबोज? हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्सनं दिली पदार्पणाची संधी