बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिस-या वनडे सामन्यात ऋतुराज गायकवाड याची अंतिम अकरामध्ये निवड का झाली नाही, यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण नाणेफेकीनंतर याबद्दल माहिती देताना कर्णधार केएल राहुल याने सांगितले की, गायकवाड बोटाच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झालेला नाही, त्यामुळे तो सामन्यातून बाहेर पडला आहे.
बीसीसीआयने ट्विटरवर एक अपडेट दिली आणि सांगितले की, ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) त्याच्या अंगठ्याच्या समस्येमुळे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळे निर्णायक वनडे सामन्यात तो भाग घेऊ शकला नाही.
गायकवाडच्या अनुपस्थितीत रजत पाटीदार (Rajat Patidar) याने साई सुदर्शन (Sai Sudarshan) याच्यासह सलामीची जोडी म्हणून सामन्यात पदार्पण केले. भारताने प्लेइंग 11 मध्ये दोन बदल करण्याचा निर्णय घेतला, कुलदीप यादव याला विश्रांती दिली आणि त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदर याचा संघात समावेश केला.
तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका भारताने 2-1 ने जिंकली आहे, भारताने पहिला सामना जिंकला तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने जोरदार पुनरागमन केले आणि मालिका बरोबरीत केली. तिसऱ्या महत्वपूर्ण सामन्यात आफ्रिकेने नाणेफेक जिंकुण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 8 विकेट्स गमावून 296 धावा केल्या. तर या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिका संघ 218 धावात सर्वबाद झाला. याआधी, दोन्ही संघांमधील टी20 आंतरराष्ट्रीय मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली होती, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.
कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह आगामी कसोटी मालिकेसाठी आफ्रिकेत पोहचले आहेत. दरम्यान, रजत पाटीदार याने वनडे पदार्पण केले आणि पहिल्या सामन्यात 16 चेंडूत 22 धावा केल्या.(The Big Reveal Why Rituraj Gaikwad did not play the third match, the big reason came to light)
हेही वाचा
IPL 2024: कसं शक्य आहे! लिलावात मिळाले २० लाख, पण प्रत्यक्ष मिळणार ५० लाख
IND vs SA: व्हिडीओ व्हायरलः शतकवीर संजू सॅमसनने हटक्या पद्धतीने केले सेंच्युरी सेलीब्रेशन