भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा शेवटचा दिवस खेळायचा बाकी आहे. शेवटच्या दिवशी वेस्ट इंडीजला विजयासाठी 289 धावा हव्या आहेत. पण यजमान संघाची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. दिवसाचा खेळ सुरू होण्यासाठी उशीर होणार, असे दिसते. त्रिनदादमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील हा सामना सध्या रोमांचक वळणावर आहे. विजयासाठी वेस्ट इंडीजला अजून 289 धावा हव्या आहेत. भारताकडून शेवटच्या डावात त्यांना 365 धावांचे लक्ष्य मिळाले होते. चौथ्या दिवसाखेर वेस्ट इंडीज संघाची धावसंख्या 2 बाद 76 धावा होती. भारताला जिंकण्यासाठी शेवटच्या दिवशी 8 विकेट्स घ्याव्या लागतील, तर दुसरीकडे वेस्ट इंडीजला जिंकण्यासाठी 289 धावा कराव्या लागतील. अशात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे पाहुण्या संघापेक्षा जयमान संघाची चिंता अधिक वाडल्याचे दिसते.
मालिकेतील पहिला सामना भारताने डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. अशात दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पराभूत झाला, तरीही मालिका बरोबरीवर सुटणार आहे. पण वेस्ट इंडीजला जर शेवटच्या दिवशी लक्ष्य गाठता आले नाही, तर कसोटी मालिका भारताच्या नावावर होईल.
Bad news.
It's raining heavily on Day 5. pic.twitter.com/ZUej3C1naW
— Johns. (@CricCrazyJohns) July 24, 2023
वेस्ट इंडीजविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन वनडे सामन्यांची आणि पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. उभय संघांतील वनडे मालिका 27 जुलै रोजी सुरू होईल आणि 1 ऑगस्टला शेवटचा सामना खेळला जाईल. टी-20 मालिकेतील पहिला सामना 3 ऑगस्ट रोजी खेळला जाईल, तर शेवटचा टी-20 सामना 13 ऑगस्ट रोजी पार पडेल.
(WI vs IND 2nd Test It’s raining heavily on Day 5.)
बातमी अपडेट होत आहे…
महत्वाच्या बातम्या –
मनिका, नतालियाच्या अविश्वसनीय खेळाने बंगळुरू स्मॅशर्सचे यूटीटीमधील आव्हान कायम
‘असा’ असेल वनडे विश्वचषकासाठीचा भारतीय संघ! दिग्गजाने शिखर धवनलाही दिली संधी