इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर रवाना होईल. वेस्ट इंडीज दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेसाठी यापूर्वीच बीसीसीआयने संघाची घोषणा केली होती. त्यानंतर गुरुवारी (१४ जुलै) बीसीसीआयने उभय संघातील टी-२० मालिकेसाठी संघ घोषित केला आहे. कुलदीप यादव याचे या मालिकेतून संघात पुनरागमन झाले आहे, परंतु त्याचा सहकाही युझवेंद्र चहल याला मात्र संघात संधी मिळाली नाहीये.
फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी भारतीय संघासाठी अनेक सामन्यांमध्ये महत्वपूर्ण प्रदर्शन करून संघाला विजय मिळवून दिला आहे. परंतु मागच्या मोठ्या काळापासून या दोघांना देशासाठी एकत्र खेळता आले नाहीये. वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेत कुलदीप यादवला संघात संधी मिळाली आहे, परंतु युझवेंद्र चहल संघातून वगळला गेला आहे. या दोघांची जोडी बीसीसीआयने पुन्हा एकदा फोडल्यामुळे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.
दरम्यान, माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना या टी-२० मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. विराटला वारंवार मिळणाऱ्या विश्रांतीमुळेही चाहते चांगलेच संतापले आहेत. सोशल मीडियावरही याविषयी वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदिप यादव, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडला गेलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान , प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
एकाच संघात ४ यष्टीरक्षक, पण यष्टीमागे पंतभाऊच उभा ठाकणार! पाहा कोण आहेत ते चौघे
विराटला पुन्हा विश्रांती! वनडेबरोबर वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० संघातूनही वगळले
आयसीसी क्रमवारीत अव्वल असलेला जसप्रीत बुमराह विंडीजच्या दौऱ्यातून बाहेर, कारण माहितीय का?